Inter Caste Marriage :  लग्न (Wedding) हे असे पवित्र बंधन आहे, ज्याचा आपल्या समाजात खूप आदर केला जातो. बदलत्या काळानुसार नव्या विचारसरणीने समाजात स्थान निर्माण करायला सुरुवात केली, मात्र असे असले तरी आजही अनेकजण आंतरजातीय विवाहाबाबत जुनीच विचारसरणी घेऊन जगत आहेत. आजही समाजात अशा प्रकारच्या विवाहाला मान्यता कमी आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांमधील जातीय मतभेद संपवण्यासाठी सरकारकडून एक योजना राबविण्यात येते.


कुठली आहे शासनाची योजना?


या योजनेचे नाव डॉ आंबेडकर फाउंडेशन आहे. या शासकीय योजनेंतर्गत नवविवाहित जोडप्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बदलण्यास तसेच सामाजिक विचार बदलण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल. डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना ही आर्थिक मदत दिली जाते. या योजनेला डॉ.भीमराव आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे.


डॉ आंबेडकर फाउंडेशन योजनेची आवश्यक पात्रता-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय किमान 18 वर्षे आणि मुलाचे वय किमान 21 वर्षे असावे.
यासोबतच यातील एक दलित समाजातील तर दुसरा दलित समाजाबाहेरील असावा.
यासह, मुलगा आणि मुलीने हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत त्यांच्या विवाहाची नोंदणी केली आहे.
दोघेही दलित समाजातील असतील किंवा दोघेही दलित समाजातील नसतील तर त्यांना लाभ मिळू शकत नाही.


'या' लोकांना मिळणार नाही लाभ
या योजनेचा लाभ केवळ पहिल्‍यांदा विवाह करणा-या जोडप्‍यांनाच मिळू शकतो. पत्नी किंवा पती यापैकी एकाचे दुसरे लग्न झाल्यास तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. लग्नाची नोंदणी केल्यानंतर, नवविवाहित जोडप्याला तुमचे विवाह प्रमाणपत्र सादर करावे लागतील. यानंतर कपल डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनसाठी अर्ज करा. लक्षात ठेवा की या योजनेचा लाभ लग्नानंतर एक वर्षाच्या आतच घेता येईल. एक वर्षानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...