Share Market Update : शेअर बाजारावर (Share Market) देखील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल (Assembly Election 2022) सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. बाजाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स (Sensex) एक हजार अंकाने वधारला आहे. आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकाला आहे. याचा बाजारावर सकारात्मक परिणाम दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकाला दिवशी सेन्सेक्स एक हजार अंकानी वधारला असून निफ्टी (Nifty 50) देखील 321 अंकांनी वर आहे. सोबतच जागतिक बाजारपेठांमध्ये तेजी पाहायला मिळत असल्यानं बाजार वधारला आहे. बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी दोन टक्क्यांहून अधिक व्यापार करत होते. 


BSE सेन्सेक्स 1100 अंकांनी किंवा 2.04 टक्क्यांनी वाढून 55,800 वर व्यापार करत आहे, तर निफ्टी निर्देशांक 500 अंकांनी वाढून 16757 वर पोहोचला आहे. अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, बजाज फायनान्स सेन्सेक्समध्ये आघाडीवर आहेत. 


निफ्टी मेटल वगळता, सर्व निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक सकारात्मक क्षेत्रामध्ये व्यवहार करत होते. बँक निफ्टीच्या नेतृत्वात 3.6 टक्क्यांनी वाढ झाली. निफ्टी ऑटो 3.15 टक्‍क्‍यांनी, निफ्टी एफएमसीजी दोन टक्‍क्‍यांनी आणि निफ्टी आयटी निर्देशांक अर्धा टक्‍क्‍यांनी वाढला. कच्च्या तेलाचे भाव 111 डॉलर्सवर आल्याने जागतिक बाजारात उत्साह कायम आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha