Ramadan 2022 : रमजानचा (Ramadan 2022) पवित्र महिना सुरू झाला आहे. या दरम्यान मुस्लिम बांधव दिवसभर उपवास करतात. ते सूर्योदयापासून सूर्यास्‍तापर्यंत काहीही खात किंवा पित नाहीत. हा उपवास करत असलेले सूर्यास्‍तानंतर इफ्तार प्रथेचा भाग म्‍हणून उपवास मोडू शकतात. सलग 30 दिवसांपर्यंत काहीही न खाता-पिता उपवास करणे आव्‍हानात्‍मक आहे. म्‍हणूनच या काळात मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींनी अधिक काळजी घेणे आणि त्‍यांच्‍या रक्‍तातील साखरेच्या पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी नियमितपणे योग्‍य आहाराचे सेवन करणे आवश्‍यक आहे.
उपवासाचे स्‍वरूप आणि या सणादरम्‍यान सेवन केले जाणारे खाद्यपदार्थ पाहता उपवास करत मधुमेहावर नियंत्रण ठेवणे अत्‍यंत अवघड आहे. 


जोथीदेव डायबिटीज रिसर्च सेंटरचे अध्‍यक्ष आणि व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. ज्‍योतीदेव केशवदेव म्‍हणतात, ''मधुमेह या आजारामध्‍ये नियमितपणे देखरेख करणे आणि रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या सामान्‍य रेंजमध्‍ये राहण्‍याबरोबरच त्‍यामध्‍ये किमान चढ-उतार होण्‍याची काळजी घेण्‍याची गरज भासते. रमजानदरम्‍यान मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींची सतत तपासणी होणे गरजेचे आहे. कारण ते 10 ते 12 तासांपेक्षा अधिक वेळ उपवास करतात.''


उपवासादरम्‍यान संतुलित आहार सेवन करणे आणि आरोग्‍यदायी जीवनशैली राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. या दरम्यान, नेमकी कोणती काळजी घ्यायची ते जाणून घ्या. 


इफ्तार आणि सेहरीदरम्‍यानचे भोजन :  कर्बोदकांनी संपन्‍न आणि शरीरामध्‍ये सहजपणे पचेल अशा खाद्यपदार्थासह इफ्तार भोजन सेवन करा. जसे एक ते दोन खजूर किंवा दूध, जटिल कर्बोदके जसे ब्राऊन राईस आणि चपाती खा.  सेहरीदरम्‍यान एखादी व्‍यक्‍ती तृणधान्‍ये, भाज्‍यांचे सेवन करू शकते आणि जितक्‍या उशिरा सेवन कराल तितके चांगले आहे. तसेच एखादी व्‍यक्‍ती मासे, तोफू आणि नट्स यांसारखे लीन प्रोटीन्‍स सेवन करू शकते. हे खाद्यपदार्थ ऊर्जा देतात. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्‍लास दूध किंवा फळाचे सेवन केल्‍यास पहाटेपर्यंत रक्‍तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्‍यास मदत होईल. 


नियमित व्‍यायाम : खरंतर नियमितपणे व्यायाम करणं कधीही चांगलंच. पण, उपवासादरम्‍यान व्‍यायामाचे प्रमाण कमी ठेवा. योगासारखे सौम्‍य व्‍यायाम करता येऊ शकतात. रमजानदरम्‍यान कॅलरी कमी प्रमाणात मिळत असल्‍यामुळे व्‍यायाम कमी केल्‍याने स्‍नायूंचे नुकसान होत नाही. 


झोपण्‍याच्‍या पद्धती :  पुरेशी झोप मिळणे महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप मिळाली नाही तर भूकेच्‍या हार्मोन्‍सवर परिणाम होऊ शकतो. ज्‍यामुळे उपाशी पोटी उच्‍च कॅलरी संपन्‍न खाद्यपदार्थ खाण्‍यावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. चयापचय क्रियेसाठी झोप अत्‍यंत महत्त्वाची आहे. ही क्रिया रक्‍तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्‍यासाठी मदत करते, जे मधुमेहावर नियंत्रणासाठी आवश्‍यक आहे.    


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha