Important days in 8th April : एप्रिल महिना सुरु होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 8 एप्रिलचे दिनविशेष. 


1928 : मराठी साहित्यिक रणजित देसाई यांचा जन्म


नामवंत मराठी साहित्यिक रणजित देसाई यांचा (8 एप्रिल 1928) रोजी झाला. तर (6 मार्च 1992) साली मृत्यू झाला. रणजित देसाई हे प्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांना स्वामीकार नावानेदेखील ओळखले जाते.


1957 : मंगल पांडे यांना फाशी


1957 च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. मंगल पांडे यांचा जन्म 19 जुलै 1827 साली झाला होता.  मंगल पांडे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते. देशाच्या रक्षणाकरता आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांमध्ये आजही मंगल पांडे यांचे नाव अभिमानाने आणि आदराने घेतले जाते.


1938  :  अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिलीच आगबोट


द ग्रेट वेस्टर्न हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोहोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिलीच आगबोट आहे.


1979 : भारतीय गायक-गीतकार अमित त्रिवेदी यांचा जन्म


प्रसिद्ध संगीतकार, गायक अमित त्रिवेदी यांचा 8 एप्रिल 1979 साली जन्म झाला. बॉलिवूडच्या आघाडीच्या संगीतकारांमध्ये अमित त्रिवेदीचे नाव घेतले जाते. वेगळेपणा ही त्यांच्या संगीताची ओळख आहे.


1911 : डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी लावला अतिसंवाहकतेचा शोध


डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी 1911 साली अतिसंवाहकतेचा (Superconductivity) शोध लावला.


1929 : भगतसिंह व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत केला बॉम्बस्फोट


भगतसिंह व बटुकेश्वर दत्त यांनी 1929 साली दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला. विधेयकांना विरोध करण्यासाठी व लालाजींच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत बाँब टाकण्याचे ठरविले. 8 एप्रिल 1929 रोजी ही विधेयके मांडण्यात आली.भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी कोणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या सभागृहात बाँब फेकला, हवेत गोळ्या झाडल्या व निषेधपत्रके भिरकावली. त्यांच्या निषेधपत्रात ‘बहिऱ्या झालेल्या लोकांसाठी हा मोठा आवाज असून खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यासाठी बलिदान चालू आहेʼ, असा मजकूर होता. त्यानंतर पळून न जाता दोघेही 'इन्किलाब जिंदाबाद' अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले.


1924 : शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचा जन्म


एक सर्जनशील थोर संगीतकार व समर्थ गायक अशी शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ यांची ओळख आहे. त्यांनी स्वत:च्या आगळ्यावेगळ्या गायकीने प्रेक्षकांवर जादू केली आहे. ‘कुमार गंधर्व’ ही पदवी त्यांना गुरुकल्ल मठाचे शांतिवीरस्वामी यांनी त्यांना त्यांच्या विलक्षण गायकीबद्दल दिली.


1950 : अभिनेते विजय मोहंती यांचा जन्म


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते ओडिया चित्रपट अभिनेते विजय मोहंती यांचा 1950 साली जन्म झाला. तर 20 जुलै 2022 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


1994 : बंकिमचंद्र चटर्जी यांचे निधन


वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र  चटर्जी यांचे निधन झाले. बंकिमचंद्रांनी जे महान काम केले, ते संपूर्ण भारतासाठी, बंगालसाठी होते. म्हणूनच नियतीने त्यांना राष्ट्रीय विकासातील अग्रणीची भूमिका बहाल केली.


1974 : नानासाहेब फाटक यांचे निधन


नानासाहेब फाटक यांचे मूळ नाव गोपाळ गोविंद फाटक आहे. त्यांना रक्षाबंधन या नाटकाच्या माध्यमातून नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. त्यांचे नटसम्राट हे नाटक चांगलेच गाजले होते. 8 एप्रिल 1974 साली नानासाहेब यांचे निधन झाले.


1982 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा वाढदिवस


अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य सुपरस्टार आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव 'पुष्पा-द रूल' असे असणार आहे. हा सिनेमा 2022 च्या डिसेंबरमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


महत्वाच्या बातम्या :