Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
पंचगंगा सीड्स प्रा. लि. औरंगाबाद, बारामती सहकारी बँक आणि महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर या ठिकाणी काही जागांसाठी भरती होत आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
पंचगंगा सीड्स प्रा. लि., औरंगाबाद
विविध पदांच्या 28 जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट – लेखाधिकारी (Accounts officer)
शैक्षणिक पात्रता – B.Com/M.Com./Tally/ अनुभव
एकूण जागा - 5
थेट मुलाखत होणार आहे.
मुलाखतीची तारीख – 10 एप्रिल 2022
दुसरी पोस्ट - प्रक्रिया सहाय्यक (Processing assistant)
शैक्षणिक पात्रता – B.Sc./B.A./B.Com/ पदवीधर/ अनुभव
एकूण जागा – 5
थेट मुलाखत होणार आहे.
मुलाखतीची तारीख – 10 एप्रिल 2022
तिसरी पोस्ट – पर्यवेक्षक (Supervisor)
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर, शेतकरी कुटुंबातील उमेदवारांनी अर्ज करावा, असं कंपनीच्या जाहिरातीत आहे.
एकूण जागा – 10
थेट मुलाखत होणार आहे.
मुलाखतीची तारीख – 10 एप्रिल 2022
चौथी पोस्ट – वाहनचालक
शैक्षणिक पात्रता – हलके/ जड वाहन चालवण्याचा परवाना आणि अनुभव
एकूण जागा – 3
थेट मुलाखत होणार आहे.
मुलाखतीची तारीख – 10 एप्रिल 2022
पाचवी पोस्ट – सुरक्षा सहाय्यक (Security Assistant)
शैक्षणिक पात्रता – दहावी/ बारावी/ पदवीधर
एकूण जागा – 5
थेट मुलाखत होणार आहे.
मुलाखतीची तारीख – 10 एप्रिल 2022
संपर्कासाठी नंबर आहेत – 9096518193/ 9022304993
मुलाखतीचा पत्ता - पंचगंगा सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट क्र. बी-12, एम.आय.डी.सी. क्षेत्र, वाळूज, औरंगाबाद- 431136
कंपनीकडून काही खास सूचनाही करण्यात आल्या आहेत. कंपनीमध्ये अगोदर मुलाखत दिलेली असल्यास पुन्हा मुलखतीला येऊ नयेत.
बारामती सहकारी बँक
विविध पदांच्या 21 जागांसाठी भरती होत आहे.
पोस्ट - Credit Appraisal Head, Internal Audit Officer, Compliance Officer, Recovery Officer, HR Manager, Chief Risk Officer, MIS Officer, Cyber Security Officer, Computer Programmer, Data Center Attendant
शैक्षणिक पात्रता – पदवीधर/ CA/ MBA, B.E.(Computer/ IT) (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
एकूण जागा – 21
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता - बारामती सहकारी बँक, भिगवण रोड, बारामती, जिल्हा पुणे- 413102 तुम्ही अर्ज ईमेलवरही पाठवून शकता. ईमेल आयडी आहे. - recruitment@baramatibank.com
तपशील – www.baramatibank.com (या वेबसाईटवर गेल्यावर vacancy & recruitment वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर
पोस्ट – विशेषज्ञ आणि निवासी विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता – पी.जी. डिग्रीसह MBBS
एकूण जागा – 7
नोकरीचं ठिकाण- सोलापूर
थेट मुलाखत होणार आहे.
मुलाखतीची तारीख – 12 एप्रिल 2022
मुलाखतीचा पत्ता- वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सोलापूर
तपशील - www.esic.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर RECRUITMENT वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महत्त्वाच्या बातम्या: