Important days in 6th April : एप्रिल महिना सुरु होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 6 एप्रिलचे दिनविशेष.  


1890 : जिगर मुरादाबाजी यांचा जन्म


जिगर मुरादाबाजी यांचा जन्म 6 एप्रिल 1890 रोजी झाला. हे 20 व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध उर्दू कवी आणि उर्दू गझलांच्या प्रमुख स्वाक्षऱ्यांपैकी एक होते . आतिश-ए-गुल" या त्यांच्या अत्यंत प्रशंसित काव्यसंग्रहासाठी 1958 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


1896 : आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे1500 वर्ष हे खेळ बंद होते.


1917 : मराठी कथाकार आणि कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी यांचा जन्म


हणमंत नरहर जोशी, अर्थात "काव्यतीर्थ" कवी सुधांशु यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे झाला. ते मराठी भाषेतील कवी होते. त्यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत. मराठी कवी कवी कुंजविहारी यांनी ह.न. जोश्यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. इ.स.1937 पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. कवी सुधांशूंना शंकराचार्यांकडून काव्यतीर्थ ही पदवी मिळाली. भारत सरकारकडून इ.स. 1974 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  


1918 : पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.


पहिले महायुद्ध, पहिले महायुद्ध, ग्रेट वॉर, किंवा वॉर टू ॲन्ड ऑल वॉर्स या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध 28 जुलै 1914 पासून 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत चालले. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अशा या युद्धात 7 कोटी सैनिकांनी भाग घेतला ज्यापैकी 6 कोटी सैनिक युरोपियन होते. 


1930 : प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू 


मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा (मोर्चा) साबरमती आश्रमापासून 12 मार्च 1930 रोजी सुरू झाली ती 6 एप्रिल 1930 ला ही यात्रा संपली. गांधीजींच्या बरोबर त्यांचे 78 निवडक अनुयायी होते. त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता. यात्रा पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा 24 दिवस चालली आणि तिच्यातील लोक 385 कि.मी. पर्यंत पायी चालले. यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी 6 एप्रिल 1930 ला पोहोचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली. दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते समुद्र किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले.


1931 : अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा जन्मदिन


सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. त्यांचा जन्म 6 एप्रिल 1931 रोजी झाला. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. आँधी,अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात राहिले. विशेषकरून, आँधी हा त्यांचा हिंदी सिनेमा विशेष लक्षात राहिला. 


1956 : क्रिकेटपटू व प्रबंधक दिलीप वेंगसरकर यांचा जन्म


दिलीप वेंगसरकर यांचा जन्म 6 एप्रिल 1956 रोजी महाराष्ट्र राज्यात राजापूर येथे झाला. भारतीय क्रिकेट खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या काळात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शैली असलेले फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते. 1983 च्या विश्व चषकात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. यावर '83' नावाचा सिनेमादेखील प्रदर्शित झाला आहे. 


1980 : भारतीय जनता पक्षाची स्थापना


1975 साली पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला आणि जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. 1977 साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. 1977 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आणि मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार 1980 साली कोसळले आणि जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजपचा चेहरामोहरा जनसंघासारखाच होता.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha