IPL 2022 :  मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 15 हंगमाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. पण प्रत्येक हंगामात मुंबई इंडियन्सला सुरुवातीचे सामने हारताना सर्वांनी पाहिलेय. पण यंदा मुंबईला हा कारनामा करणं कठीण वाठतेय. कारण, संघाची ताकदच कमकुवत बाजू झाली आहे.

  


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी हा हंगाम खास राहिलेला नाही. रोहित शर्माची बॅट शांत आहे. आतापर्यंत रोहित शर्माने आयपीएलमध्ये फक्त 41 धावा काढल्या आहेत. रोहित शर्माला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही, त्यामुळे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. त्याशिवाय मागील हंगामातही रोहित शर्माची बॅट शांत होती. गेल्या हंगमात रोहित शर्माला 13 सामन्यात 381 धावा काढता आल्या होत्या.  रोहित शर्माची सरासरी धावसंख्या फक्त 29.30 इतकी होती. रोहित शर्मासारखा दर्जेदार फलंदाज न चाललल्याचा  फटका संघाला बसला. रोहित शर्मा सतत फ्लॉप होत असल्यामुळेच मुंबईला पराभवाचा सामना करावा लागलाय. मुंबईला आयपीएलमध्ये पुनरागमन करायचं असल्याचे रोहित शर्माला धावांचा पाऊस पाडवा लागणार आहे. 


सूर्यकुमार यादवची अनुपस्थिती -  
सुर्यकुमार यादवची अनुपस्थिती मुंबईसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव संघाबाहेर आहे, त्यामुळे मुंबईचा मध्यक्रम कमकुवत वाटत आहे. सूर्यकुमारच्या जागी सध्या अनमोलप्रीतला संधी देण्यात आली आहे. पण अनमोलप्रीतला हवं तसं यश मिळत नाही. 


अनुभवाची कमी -  
मुंबई संघाकडे अनुभवी मध्यक्रम फलंदाज नाहीत.  अनमोलप्रीतने तीन सामन्यात फक्त 27 धावा काढल्या. त्याशिवाय टिम डेविडनेही निराश केलेय, दोन सामन्यात फक्त 13 धावा काढता आला.  मुंबईच्या कामगिरीमध्ये सध्या ईशान किशन आणि तिलक वर्मा यांनी दमदार प्रदर्शन केलेय. पण तिलक वर्माकडेही अनुभव नाही.  त्यामुळे दबावात तिलक वर्मा कशी फलंदाजी करतो, पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


हे देखील वाचा-