Important days in 4th April : एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. अशा वेळी प्रमुख सण कोणत्या दिवशी आहेत, सामाजिक आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे याची माहिती आम्ही तुम्हाला या दिनविशेषच्या माध्यमातून देणार आहोत. त्यानुसार जाणून घ्या 4 एप्रिलचे दिनविशेष.
1924 : महात्मा गांधी यांनी ‘यंग इंडिया’ आणि ‘नवजीवन’ या वृत्तपत्रांचे संपादकपद स्वीकारले
यंग इंडिया ही महात्मा गांधींनी सन 1919 ते 1931 पर्यंत प्रकाशित केलेली इंग्रजी साप्ताहिक पत्रिका होती. या पत्रिकेत लिहिलेल्या गांधीजींच्या सुविचारांनी अनेकांना प्रेरित केले. ब्रिटनपासून भारताच्या अखेरच्या स्वातंत्र्यासाठी विचार करण्यासाठी आणि जनतेला संघटित करण्याच्या आणि स्वातंत्र्य चळवळीला योजनाबद्ध करण्याच्या उद्देशाने त्यांनी आंदोलनांच्या आयोजनांत अहिंसेचा वापर करण्याच्या आपल्या अनोख्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी यंग इंडियाचा उपयोग केला.
1949 : (NATO) या संस्थेची स्थापना
पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा 12 देशांनी नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.सन 1949 साली पश्चिम युरोपियन राष्ट्र व उत्तर अमेरिका या दोन राष्ट्रांमध्ये संरक्षणविषयक करार म्हणजेच उत्तर अटलांटिक करार (‘नाटो’ करार) वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये करण्यात आला. पश्चिम युरोपातील अकरा देश व अमेरिका अश्या 12 देशांमध्ये हा करार झाला.
1968 : नासाने अपोलो-6 चे प्रक्षेपण
याच दिवशी सन 1968 साली अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाने आपले अपोलो-6 हे अंतराळ यान प्रक्षेपित केले.
1968 : मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या (जन्म: 15 जानेवारी 1929)
मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर हे एक अमेरिकन सुधारक व धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते यांची या दिवशी हत्या झाली.
1889 : पंडित माखनलाल चतुर्वेदी यांचा जन्मदिन
सन 1889 साली पद्मभूषण आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त भारतीय कवी, लेखक, निबंधकार, नाटककार आणि पत्रकार पंडित माखनलाल चतुर्वेदी यांचा जन्मदिन. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. 1921 मध्ये त्यांनी स्वातंत्र्यआंदोलनात भाग घेतला आणि तुरुंगवासही भोगला. प्रभा, कर्मवीर, प्रताप ह्या नियतकालिकांचे ते संपादक होते. भरतपूर येथील ‘संपादक संमेलना’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले
1990 : लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं नाव भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून मोठ्या प्रमाणावर गणले जाते. आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यातलाच एक पुरस्कार म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार. हा पुरस्कार लतादीदींना 1990 साली देण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha