एक्स्प्लोर
ओठांचा काळेपणा असा दूर करा...

मुंबई: आपले ओठ आकर्षक असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण अनेकदा ओठ काळं पडण्याची समस्या अनेकाना भेडसावते. त्यामुळे ओठांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कशी घ्याल ओठांची काळजी? ओठांचं काळेपणा दूर करण्यासाठी साखर आणि मध यांचं टेन पॅक किंवा काही ग्लास पाणी हे फारच उपायकारक असतं. अस एका तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 'दिल्ली स्किन सेंटरचे' प्रमुख आणि कॉस्मेटिक त्वचा तज्ज्ञ डॉ. मेघना गुप्ता यांनी ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. लिप बाम: अशा लिप्स बाम किंवा लिपटिक्सचा वापर करा ज्यामध्ये एसपीएफ 20 असेल. एक्सफोलिएट: मध आणि साखर यांचं टैन पॅक ओठावरील कठोर त्वचा हटविण्यासाठी मदत करतं. तसंच बदामाचं तेल ओठांवरील मुलायमपणा कायम ठेवतं. भरपूर पाणी प्यावं: पाणी कमी पित असल्यास ओठ काळे पडू शकतात. त्यासाठी दिवसातून किमान रोज आठ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. लिंबू, बटाटा आणि बीटचा रस: रोज रात्री आपल्या ओठांवर लिंबू, बटाटा आणि बीट याचा रस लावावा. सकाळी ते धुवून टाकावं. या उपायांनी ओठांचं काळेपणा दूर होऊन त्यांचा गुलाबीपणा टिकून राहण्यास मदत होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
अमरावती
महाराष्ट्र
बीड





















