Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
विधान परिषद निवडणुकीच्या या धामधुमीत काल अब्दुल सत्तार यांनी एक वेगळाच विषय छेडला... छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत राजकारणात आपली अगतिकता दाखवताना त्यांनी भाजपवर टीका केली... त्यानंतर आज ठाकरेंच्या नेत्यांनी सत्तारांच्या विधानांचा धागा पकडून शिंदे आणि भाजपवर टोलेबाजी केली... त्याच वेळी शिंदेंच्या नाराज नेत्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे असल्याचंही सांगितलं... दोन्ही शिवसेनांच्या विलिनीकरणाची काल सुरू झालेली चर्चा अशा रितीनं पुढे सरकरली खरी... मात्र सध्याची राजकीय स्थिती पाहता हा मुद्दा क्षणिक ठरण्याचीच शक्यता अधिक आहे...
शिवसेना आमदार अब्दुल सत्तार भावनेच्या भरात हे बोलून गेले...
त्याचं झालं असं... की सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी एक विधान केलं...
दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अशी इच्छा व्यक्त करतानाच भाजप आपल्या मित्रपक्षांना संपवत असल्याचा दावा दानवेंनी केला...
यावर प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार चांगलेच भावूक झाले अन् चक्क भाजपनं आपल्या पक्षाचं मुंडकंच उडवल्याचा गंभीर आरोप केला...
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत भाजपकडून झालेला पराभव... आणि सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीत संभाजीनगर-जालन्याची जागा भाजपला सुटल्यामुळे सत्तार यांच्या भावनांचा कडेलोट झाला... सत्तार यांचे चिरंजीव समीर यांनी या निवडणुकीत भाजपविरोधात अर्ज दाखल केलाय... सत्तार यांनी भाजपवर टीका करण्याचं हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे.
सत्तार बोलून गेले अन् ठाकरेसेनेच्या नेत्यांना भाजप आणि शिंदेंवर टीकेसाठी आयतं कोलित मिळालं...
शिवसेना दोन नाहीत, तर आपली एकच शिवसेना आहे असं ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर करून टाकलं...
All Shows































