Holi 2022 WhatsApp Stickers : संपूर्ण देशभरात होळीचा (Holi 2022) सण अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. मागच्या दोन वर्षांत कोरोनामुळे हा उत्साह कुठेतरी हरवला होता. परंतु, यावर्षी काही नियमांचे पालन करून हा सण साजरा केला जाणार आहे. अशा वेळी, शक्य तितके नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. आता सण म्हटला की शुभेच्छा आल्याच. अशा वेळी आपले नातेवाईक, मित्र मैत्रीणी यांना शुभेच्छा पाठवण्यासाठी काही खास पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


व्हॉट्सअॅप  स्टिकर्स कसे वापरायचे ते जाणून घ्या :


 सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा वेळी काही व्हॉट्सअॅम स्टिकर्सच्या माध्यमातून तुम्ही हे स्टिकर्स डाऊनलोड करू शकता. हे स्टिकर्स डाऊनलोड करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स जाणून घ्या.   


अशा प्रकारे होळीचे व्हॉट्सअॅप स्टिकर्स डाऊनलोड करा



  • सर्वप्रथम तुमच्या WhatsApp चॅट विंडोवर जा.

  • आता विंडोमधील Smiley आयकॉनवर जाऊन क्लिक करा. 

  • येथे तुम्हाला GIF आणि Stickers चा पर्याय दिसेल.

  • त्यानंतर स्टिकर आयकॉनवर क्लिक करा.

  • येथे तुम्हाला Get More Stickers चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • या लिंकवर क्लिक केल्यानंतर गुगल प्लेस्टोअर ओपन होईल.

  • येथे तुम्ही Happy Holi सर्च करा. तुम्हाला नवीन स्टिकर्स दिसतील.

  • येथून तुम्ही तुमचे आवडते स्टिकर्स पॅक डाऊनलोड करू शकता.

  • एकदा स्टिकर्स पॅक डाऊनलोड झाल्यानंतर, चॅटवर परत जा आणि तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवण्यासाठी हे स्टिकर्स वापरा.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha