Crude Oil Prices : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude oil)  किंमतीबाबत दिलासा देणारी बातमी आहे. रशिया (Russia) - युक्रेन (Ukraine) तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आता कमी झाली आहे. सलग तीन आठवडे 100 डॉलर बॅरलच्या वर राहिल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत (Crude Oil Price) प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आली आहे. 


कच्च्या तेलाच्या किमती आज प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आल्या आहेत. ही भारतातील पेट्रोलियम कंपन्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आज सकाळी 7.15 वाजता नायमॅक्सवर कच्चे तेल प्रति बॅरल $0.59 वाढल्यानंतर $97.24 प्रति बॅरलवर आले आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.74 टक्क्यांनी वाढल्यानंतर प्रति बॅरल $100.65 वर व्यापार करत आहे.



काल (मंगळवारी) दरांमध्ये झाली होती घट 


सलग दोन आठवडे 100 डॉलर प्रति बॅरलच्यावर राहिल्यानंतर मंगळवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 99.84 डॉलर प्रति बॅरलवर आल्या. यामुळे किरकोळ तेल कंपन्यांवरील मार्जिनचा दबाव कमी झाला आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होऊनही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. मंगळवारी ब्रेंट क्रूड सात टक्क्यांनी घसरलं. यापूर्वी, 28 फेब्रुवारी रोजी ते प्रति बॅरल $100 वर गेलं होतं आणि 7 मार्च रोजी प्रति बॅरल $ 139 या 14 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचलं होतं.


चीनकडून कच्च्या तेलाची मागणी घटल्यानंतर दरांवर परिणाम 


आंतरराष्ट्रीय बाजारावर चीनमध्ये पुन्हा वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम झाला आहे. जगातील इतर देशांपैकी कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात चीन करतो. त्यामुळे त्यामुळे मागणीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. याशिवाय युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धविरामावरील चर्चेतही प्रगती होण्याची चिन्हं आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट ही भारतासाठी चांगली बातमी आहे. कारण त्यामुळे जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या तेल आयातदाराचे आयात बिल कमी होणार आहे. उद्योग विश्वातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील रिटेल तेल कंपन्यांवरील दबावही कमी होणार आहे. 


131 दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर 


भारतीय तेल कंपनी इंडियन ऑयल कॉरपोरेशन (आईओसी), भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) ने रेकॉर्ड 131 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कच्च्या मालाच्या किमतीत 60 टक्क्यांहून अधिक वाढ होऊनही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती मात्र स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर जेव्हा 81 डॉलर प्रति बॅरल होते, तेव्हापासून. म्हणजेच, चार नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी तेलाच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 


पेट्रोलियम कंपन्यांसाठी आनंदवार्ता!


देशात सुरु असलेल्या निवडणुकांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं सांगितलं जात होतं. तसेच, निवडणूक निकालांनंतर देशातील इंधनदरांत वाढ होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. पण, निवडणूक निकालांनंतरही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कच्च्या तेलाच्या दरांमध्ये झालेली घट ही पेट्रोलियम कंपन्यांसाठी आनंदवार्ता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्या; देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार?