Holi 2022 Songs: होळीला (Holi) आता अवघे 2 दिवस उरले आहेत. सर्वत्र होळीची लगबग आता सुरु झाली आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीला सर्वत्र रंगांची उधळण पाहायला मिळते. बॉलिवूडमध्येही होळीला नेहमीच विशेष महत्त्व दिले गेले आहे. बॉलिवूडमध्ये होळीवर अशी अनेक गाणी बनवली गेली आहेत, जी या उत्सवाच्या जल्लोषात आणखी भर घालतात.


यातही काही लोकांना नवी गाणी आवडतात, तर काही लोकांना जुनी गाणी आवडतात. त्यामुळे दोन दिवस आधीपासूनच गाण्यांची प्लेलिस्ट बनवायला सुरुवात होते. तुम्ही देखील अजून होळीच्या गाण्याची प्लेलिस्ट बनवली नसेल तर काळजी करून नका! आम्ही तुमचं हे काम थोडंसं हलकं करणार आहोत. आज आम्ही तुम्हाला होळीची अशी गाणी सांगणार आहोत, जी या सणाचा आनंद आणखी वाढवतील!


बलम पिचकारी


रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचे ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील हे प्रसिद्ध गाणे होळीच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी ऐकू येतेच!



अंगसे अंग लगना


शाहरुख खानच्या ‘डर’ चित्रपटातील हे गाणे होळीच्या सुपरहिट गाण्यांपैकी एक आहे. या गाण्याचे बोलच असे आहेत की, तुम्ही यावर थिरकण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही.



होली खेले रुघुवीरा


‘बागबान’ चित्रपटातील या गाण्यात अमिताभ बच्चन यांची धमाल पाहायला मिळते. होळीच्या सणात अमिताभ बच्चन यांची गाणी वाजली नाहीत, तर हा सण अधुराच वाटतो.



डू मी ए फेवर लेट्स प्ले होली


अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचे हे गाणे होळीचे वातावरण रोमँटिक आणि रंगीबेरंगी बनवते.



रंग बरसे भीगे चुनर वाली


अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे 'रंग बरसे भेजे चुनर वाली' हे होळीचे सदाबहार गाणे आहे. हे गाणे या दिवशी नक्कीच वाजवले जाते. ‘रंग बरसे’ या गाण्याशिवाय होळी अपूर्ण वाटते.



हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha