एक्स्प्लोर

Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य

Heart Health: इजेक्शन फ्रॅक्शन (इएफ) किंचित कमी झालेल्या परंतु अस्तित्वात असलेल्या हृदयविकाराच्या रुग्णांना परिणामांवर आधारित सेवेची गरज

Heart Health: हृदयविकाराबाबत (Heart health) सर्वात मोठा गैरसमज असा की, हृदयाचे पंपिंग (Heart Health) कार्य 'सामान्य' (Heart Pumping) असल्यास धोका कमी असतो. इजेक्शन फ्रॅक्शन (ईएफ) सामान्य किंवा किंचित कमी असलेल्या हृदयविकारात (ईएफपीईएफ/एचएफएमआरईएफ), इकोकार्डिओग्रामवर हृदयाचे कार्य सामान्य दिसू शकते. परंतु, रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो, त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल व्हावे लागते आणि हृदयविकारामुळे मृत्यूचा खूप धोका असतो. हृदयविकाराच्या (Heart Attack) जवळपास निम्म्या रुग्णांचा या श्रेणीत समावेश होतो आणि त्यांचे इजेक्शन फ्रॅक्शन ≥४०% असते, परंतु अनेक रुग्णांचे निदान होत नाही किंवा त्यांच्यावर वर्षानुवर्षे अपुरा उपचार केला जातो. 

भारतातील हृदयविकाराचा भार वाढतच आहे. सुमारे 1.3 दशलक्ष ते 22.7 दशलक्ष लोकांना हृदयविकाराचा त्रास होतो. दरवर्षी 1.8 दशलक्ष नवीन रुग्णांचे निदान होते. भारतीय रुग्णांमध्ये उच्च-उत्पन्न असलेल्या देशातील रुग्णांच्या तुलनेत जवळपास एक दशक आधी हृदयविकार होण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे आजारपणाचा भार जास्त काळ टिकतो आणि कामाच्या वयात त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल व्हावे लागते. 

इजेक्शन फ्रॅक्शन अबाधित असले तरीही धोका कमी नाही  (Why Normal Heart Pumping Does Not Always Mean Low Risk)

ईएफपीईएफ/एचएफएमआरईएफ असलेल्या रुग्णांमध्ये दीर्घकालीन दाह, फायब्रोसिस आणि उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा अशा जुन्या आजारांमुळे डावे निलय (व्हेंट्रिकल) अनेकदा जाड, कडक आणि कमी लवचिक बनते. हृदय सामान्यपणे आकुंचन पावत असले आणि 2डी इको हार्ट टेस्टमध्ये तुलनेने अबाधित इजेक्शन फ्रॅक्शन राखत असले, तरी डायस्टोलच्या काळात म्हणजेच दोन ठोक्यांच्या मधल्या वेळेत हृदय रक्ताने भरण्याच्या अवस्थेत ते कार्यक्षमतेने शिथिल होण्याची क्षमता गमावते. परिणामी, रक्ताभिसरण चालू ठेवण्यासाठी निलयाला जास्त फिलिंग प्रेशरची आवश्यकता असते. 

डाव्या वेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशरमधील ही वाढ डाव्या अॅट्रियम आणि फुफ्फुसांमधील दाब हळूहळू वाढवते. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये रक्त साठणे, धाप लागणे, थकवा, व्यायामाची क्षमता कमी होणे आणि दैनंदिन कामांमध्येही शरीरात पाणी साठणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे अनेकदा रुग्ण गोंधळून जातात. त्यांना लक्षणे असूनही त्यांच्या हृदयाचे कार्य "सामान्य" असल्याचे सांगितले जाते. संरक्षित ईएफचा अर्थ कमी धोका असा होत नाही. ईएफपीईएफ/एचएफएमआरईएफमधील रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी ईएफ असलेल्या हार्ट फेल्युअरच्या तुलनेत सारखेच राहते आणि प्रत्येक वेळी रुग्णालयात दाखल झाल्याने दीर्घकालीन हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा धोका आणखी वाढतो. निदान होण्यासही अनेकदा उशीर होतो कारण लक्षणे वाढते वय, लठ्ठपणा, मधुमेह आणि फुफ्फुसांच्या आजारांशी मिळतीजुळती असतात, तर नेहमीच्या तपासणीत डायस्टोलिक डिसफंक्शन नेहमीच वेळेवर लक्षात येत नाही. 

हृदय-मूत्रपिंड-चयापचय यांचा संबंध 

एचएफपीईएफ क्वचितच एकटे आढळते. अनेक रुग्ण मधुमेह, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, लठ्ठपणा किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या समस्यांनी ग्रस्त असतात. भारतात आधीच 10 कोटींहून अधिक प्रौढ मधुमेही आहेत आणि त्यापैकी 40% लोकांना त्यांच्या आयुष्यात दीर्घकालीन मूत्रपिंड विकार होऊ शकतो. सुमारे 40% हार्ट फेल्युअरच्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडाचे कार्य बिघडलेले आढळते. या गोष्टी दाह आणि तंतुमय ऊतींच्या निर्मितीमुळे एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे हळूहळू हृदय आणि मूत्रपिंड या दोन्हींचे नुकसान होते. 

फायब्रोसिस म्हणजेच ऊतींवर असामान्य व्रण तयार होतात. त्यामुळे हृदय कडक होते आणि मूत्रपिंडांची योग्यरित्या गाळण्याची क्षमता कमी होते. त्याचा परिणाम म्हणून एक असे चक्र निर्माण होते, ज्यात मूत्रपिंडाचा आजार बळावल्याने हृदयावरील ताण वाढतो, तर हृदयविकारामुळे मूत्रपिंडाच्या कार्याला आणखी नुकसान पोहोचते. पूर्वी ईएफ ≥40% असलेल्या रुग्णांवरील उपचार मुख्यत्वे लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यावर केंद्रित होते, कारण कमी ईएफ असलेल्या हृदयविकारात यशस्वी ठरलेल्या उपचारांमुळे ईएफपीईएफ/एचएफएमआरईएफच्या परिणामांमध्ये सातत्याने सुधारणा होत नव्हती. डॉक्टरांना अनेकदा शरीरातील अतिरिक्त द्रव, रक्तदाब आणि मधुमेह यांचे व्यवस्थापन करावे लागत असे तर दुसरीकडे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा धोका जास्तच राहत असे. 

प्रगत उपचारांकडे कल 

अलीकडच्या वर्षांत एचएफपीईएफबद्दलची समज सुधारली आहे. आता उपचार केवळ लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यापलीकडे जाऊन आजाराच्या प्रगतीस कारणीभूत ठरणारी जळजळ आणि फायब्रोसिस यांना लक्ष्य करत आहेत. 

नवीन नॉन-स्टेरॉइडल सिलेक्टिव्ह मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टर अँटागोनिस्ट्स रिसेप्टरच्या अतिसक्रियतेला अवरोधित करतात. ते हृदय आणि मूत्रपिंड या दोन्हींवर परिणाम करणाऱ्या जळजळ आणि फायब्रोसिसचे एक प्रमुख कारण आहे. हे दुहेरी संरक्षण विशेषतः भारतात महत्त्वाचे आहे. कारण इथे बरेचदा हृदयविकार, मधुमेह आणि दीर्घकालीन मूत्रपिंड विकार हे आजार एकत्र आढळतात. 

या रुग्णांसाठी आता प्रगत उपचार पर्याय उपलब्ध असल्याने लवकर निदान, वेळेवर उपचार आणि डॉक्टरांचा नियमित सल्ला घेतल्यास हृदय आणि मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते आणि भारतात हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी काळजीसाठी अधिक सक्रिय दृष्टिकोन ठेवण्यास पाठिंबा मिळू शकतो. 

- डॉ. जगदीश हिरेमठ, वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, पुणे 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
Sayaji Shinde On Tree Cutting: 'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
Embed widget