Corn Pulao Recipe : अनेकदा घरात रात्रीचा भात शिल्लक राहतो. कधी कधी भात जास्त होतो. अशा स्थितीत उरलेल्या अन्नाचा योग्य वापर करण्याऐवजी काही लोक तो फेकून देतात. मात्र, शिळा भात फेकून न देता आपण त्याचा पुन्हा वापर करू शकतो. या भातापासून आपण इतर चटपटीत रेसिपी बनवू शकतो.


उरलेल्या भातापासून तुम्ही कॉर्न पुलाव (Corn Pulao) बनवू शकता. भाताला हा एक आरोग्यदायी आणि चवदार पर्याय आहे. या पुलावमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही भाजी घालू शकता. पुलाव हा लहान मुलांचा आवडता पदार्थ आहे. उरलेल्या भातासोबत तुम्ही कॉर्न पुलाव सहज बनवू शकता. जाणून घ्या कॉर्न पुलाव बनवण्याची रेसिपी...   


उरलेल्या भातापासून कॉर्न पुलाव बनवण्याची रेसिपी :


* सर्वप्रथम गॅस चालू करा आणि कुकर मध्यम आचेवर ठेवा.


* आता त्यात 2 चमचे तेल आणि 1-2 चमचे तूप घाला.


* तेल तापले की त्यात 2 तमालपत्र, 2 चक्र फूल, 2 मोठ्या वेलची, दालचिनीचा तुकडा टाका.


* आता त्यात 1 चिरलेला कांदा टाका, कांदा ब्राऊन होईपर्यंत परता.


* आता त्यात 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून तिखट घालून मिक्स करा.


* त्यात 1 चमचा गरम मसाला, 3-4 लवंगा आणि 5-6 काळी मिरी घाला.


* आता त्यात साधारण अर्धा कप ताजे कॉर्न टाका आणि मिक्स करा.


* त्यात थोडे पाणी घाला म्हणजे मसाले चिकटणार नाहीत.


* आता त्यात उरलेले भात घालून मिक्स करा.


* 5-10 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा.


स्वादिष्ट व्हेज कॉर्न पुलाव तयार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha