Online Paying Apps : अचानकपणे तुमचा मोबाईल हरवला तर तुम्हाला भीती वाटते. कारण PhonePe, paytm आणि Google Pay सारख्या UPI आधारित सेवा तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन (log in) असतात. या सेवा वेळेत बंद केल्या जाऊ शकतात तरीसुद्धा एक भीती निर्माण होते. 

Continues below advertisement

बऱ्याचदा या UPI आधारित ऍप्लिकेशन्सचा गैरवापर करण्याची शक्यता असते. अशा वेळी तुम्ही चोरी झालेल्या मोबाईलमधील तुमच्या सर्व UPI आधारित सेवा बंद करू शकता. या सेवा कशा बंद करता येतील याची सोपी पद्धत जाणून घ्या. 

असे करा तुमचे paytm ब्लॉक :

Continues below advertisement

1. पेटीएम बँकेच्या 01204456456 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करा.

2. त्यानंतर 'lose the phone'हा पर्याय निवडा.

3. त्यानंतर different number असे ऑप्शन दिसेल ते निवडून तुमच्या हरवलेल्या मोबाईलचा नंबर टाका.

4. नंतर सर्व डिव्हाईस लॉग आऊट (Log out) करा. 

5. नंतर पेटीएम वेबसाईटवर जाऊन 24x7 हेल्प हा पर्याय निवडा.  

6. यामध्ये तुम्ही फसवणूकीचा रिपोर्ट टाका आणि कोणत्याही कॅटेगरीवर क्लिक करा.

7. त्यानंतर तुमचा जो प्रॉब्लेम असेल त्यावर क्लिक करा आणि खाली तळाशी असलेल्या "Message Us" बटणावर क्लिक करा.

8. आता यूजरला डेबिट/क्रेडिट कार्ड खाते "Verify" करावे लागेल.

9. त्यानंतर Paytm तुमचे खाते ब्लॉक करेल.

google pay account असे ब्लॉक करा

1. Google Pay यूजर्स 18004190157 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकतात.

2. येथे यूजर्सना त्यांच्या सोयीची भाषा निवडण्याचा ऑप्शन दिसेल.  

3. त्यानंतर तुम्हाला तुमचे Google Pay खाते ब्लॉक करण्यासाठी सुविधा दिली जाईल.

4. Google Pay खाते यूजर्सने त्यांचे डिटेल्स दिल्यानंतर तुमचे अकाऊंट बंद होईल. 

असे करा phonePe account ब्लॉक  :

1. PhonePe यूजर्सना 08068727374 किंवा 02268727374 या क्रमांकावर कॉल करावा लागेल. 

2. त्यानंत तुमच्या सोयीची भाषा निवडा. 

3. तुमची तक्रार नोंदवल्यानंतर तुमचा रजिस्टर क्रमांक टाकावा लागेल.

4. यानंतर पडताळणीसाठी तुमचा OTP नंबर विचारला जाईल. 

5. तुम्हाला सिम कार्ड किंवा डिव्हाईस हरवल्याची तक्रार करण्याचा पर्याय दिला जाईल, तो निवडा.

6. त्यानंतर तुम्हाला हेल्प डेस्कशी कनेक्ट केले जाईल, जिथे तुम्हाला फोन नंबर, ईमेल आयडी, फायनल पेमेंटची माहिती इत्यादी डिटेल्स द्यावे लागतील.

7. अशा प्रकारे तुमचे PhonePe खाते ब्लॉक केले जाईल.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha