World Schizophrenia Day 2022 : मानसिक आरोग्य हा एकंदर आरोग्याचा अविभाज्य आणि आवश्यक घटक आहे कारण मानसिक आरोग्याशिवाय माणूस पूर्णपणे निरोगी मानला जात नाही. जसे शारीरिक आजार असतात तसेच मानसिक आजारसुद्धा असतात. स्किझोफ्रेनिया हा त्याच विकारांपैकी एक आहे. जो रुग्णाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतो. स्किझोफ्रेनिक रुग्णांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल लोकांना माहिती देणे आणि जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी 24 मे रोजी हा दिन पाळला जातो. 


स्किझोफ्रेनियाची म्हणजे काय?


स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक विकार आहे. ज्यामध्ये विचार, भावना, भाषा, स्वत: ची ओळख आणि वागणूक यातील विकृती आहे. हा विकार हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी, मेटाबॉलिज्म आणि संसर्गजन्य रोगांसारख्या शारीरिक आजारांशी संबंधित आहे.


स्किझोफ्रेनियाची लक्षणे :


भ्रम (Hallucination) : ऐकणे, पाहणे किंवा नसलेल्या गोष्टी जाणवणे.


भ्रम (Delusion) : वास्तविकता किंवा तर्कशुद्ध युक्तिवादाने विरोधाभासी भूमिका धारण करणे.

असामान्य वर्तन (Abnormal behavior): विचित्र वर्तन जसे की विनाकारण भटकणे, स्वतःशी हसणे, विचित्र दिसणे, इ.


अव्यवस्थित भाषण (Disorganized speech) : काहीही बडबडणे किंवा एकट्याशीच बोलणे. 


स्किझोफ्रेनिया विकारावर उपचार :


स्किझोफ्रेनिया हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. यासाठी मानसोपचारतज्ज्ञ यांच्याशी संपर्क साधून ट्रीटमेंट फॉलो करणे हा उपचार आहे. तसेच संबंधित व्यक्तीशी योग्य संवाद साधून, त्यांना नीट समजावून, तसेच चांगले वातावरण निर्माण करूनही यावर मार्ग काढता येऊ शकतो. परंतु. तज्ज्ञांचा सल्ला हाच यावर योग्य उपचार आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :