Good Sleep benefits : असं म्हणतात पुरेशा आहाराबरोबर पुरेशी झोपही तितकीच गरजेची आहे. चांगली झोप तुम्हाला फक्त शारीरिकच नाही तर मानसिक दृष्टीने देखील सक्रिय बनवते. चांगल्या झोपेने तुम्ही दिवसभर तजेलदार तर दिसतातच पण त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. चांगल्या झोपेचे असे अजून कोणते फायदे आहेत ते जाणून घ्या. 


चांगल्या झोपेचे फायदे : 



  • चांगली झोप तुमची स्मरणशक्ती वाढवते. 

  • चांगली झोप तुमचे वजन नियंत्रित ठेवते. 

  • तुमचा दिवस चांगला राहतो. मूड चांगला राहतो. 

  • रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. 

  • तुमची ऊर्जा वाढवते. 

  • शारीरिक ऊर्जा बळकट करते. 

  • तुमचे वय दिसून येत नाही. 

  • तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. 



तुम्हाला किती तासांची झोप गरजेची आहे ? 


या संदर्भात मेडिकल एडिटर आणि कंटेंट स्पेशलिस्ट डॉ. स्वाती मिश्रा म्हणतात, 3 महिन्यांच्या नवजात बालकांना 14 ते 17 तासांची झोप हवी. लहान बालकांना 4-12 महिन्यांच्या 12 ते 16 तासंची झोप हवी. 13 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना 8 ते 10 तासांची झोप तर तरूण वयोगटातील मुले तसेच वृद्धांना किमान 7 ते 8 तासांची झोप हवी. 


1. चांगली झोप येण्यासाठीच्या काही टिप्स...



  • नियमित वेळेवर झोपा. 

  • अवेळी झोपणे टाळा. 

  • झोपेच्या आधी कोणतीही तणावाची कामे करू नका.

  • ज्या कामातून तुम्हाला आनंद मिळतो तीच कामे करा. 


2. तुमच्या आहाराकडे लक्ष द्या 



  • दररोज लवकर जेवण्याचा प्रयत्न करा. तसेच ज्या पदार्थ पचनास जड जातात अशा पदार्थांचे रात्री सेवन करू नका. 

  • ज्या पदार्थांतून तुम्हाला कॅल्शिअम मिळते असे पदार्थ खा. जसे की, केळं, गहू, भोपळ्याच्या बिया, अळशी यांचे सेवन करा. 

  • झोपण्यापूर्वी कॉफी, अल्कोहोल, साखर असलेले पेय पिणे टाळा. त्या जागी गवती चहा, नैसर्गिक पेय प्या. 


3. सकारात्मक वातावरणात झोपा


तुमच्या आजूबाजूचे वातावरणाचाही परिणाम तुमच्या झोपेवर होतो. त्यामुळे तुम्हाला सकारात्मक वाटेल अशा ठिकाणी किंवा अशा जागी झोपा. ज्या ठिकाणी तुम्हाला नकारात्मक भावना येते किंवा तणाव येतो अशा ठिकाणी झोपणे टाळा. 


4. झोपण्यापूर्वी त्वचेचा व्यायम करा 


योग्य आणि चांगली झोप येण्यासाठी फक्त योग्य आहार आणि योग्य वातावरणतच महत्वाचं आहे असं नाही. तर यासाठी तुम्ही त्वचेचा व्यायाम करणं, ध्यान करणं गरजेचं आहे. जसे की,डोळ्यांची हालचाल, दिर्घ श्र्वास घ्या. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :