World Heart Day 2023 : हृदय (Heart) हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. यासाठीच आपण आपल्या हृदयाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. निरोगी हृदयासाठी आपण आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आणि अनहेल्दी आहारामुळे आपण आपल्या स्वस्थ्याकडे सहज दुर्लक्ष करतो यामुळे अनेक आजार उद्भवतात. तुम्ही जे काही खाता, त्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर होतो. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यात निरोगी आहार महत्त्वाची भूमिका बजावतात. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.


हिरव्या पालेभाज्या


हिरव्या पालेभाज्या हा पोषक तत्वांचा खजिना आहे. तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करून तुम्ही शरीरातील अनेक आजार कमी करू शकता. यासाठी पालक भाजीचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता. ही भाजी खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम यांसारख्या अनेक पोषक घटकांचा समावेश असतो. याशिवाय हिरव्या पालेभाज्यांमुळे पचनसंस्थाही निरोगी राहते.


डार्क चॉकलेट


खरंतर चॉकलेट खायला प्रत्येकाला आवडते. पण, पण डार्क चॉकलेट खाल्ल्याने हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात. त्यात फ्लेव्होनॉईड्ससारखे अँटिऑक्सिडंट असतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. हे खाल्ल्याने तुमचा मूडही चांगला राहतो. पण, डार्क चॉकलेट कमी प्रमाणात खाणं देखील गरजेचं आहे.


अक्रोड


अक्रोड हे सुपरफूड म्हणून ओळखले जाते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे तुमचे हृदयही निरोगी राहते. यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, फायबर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.


ब्लॅकबेरी


ब्लॅकबेरीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात, जे हृदय निरोगी ठेवतात. तुम्ही तुमच्या आहारात स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरीचा समावेश करू शकता. यामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. जे हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात. ब्लॅकबेरी खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. त्यात असलेले अँथोसायनिन्स सारखे अँटिऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.


फिश ऑईल


ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् समृध्द फिश ऑईल तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही नियमितपणे तुमच्या आहारात फिश ऑईलचा मर्यादित प्रमाणात समावेश केला तर ते हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास मदत करू शकते.


हृदयासाठी हानिकारक पदार्थ



  • एनर्जी ड्रिंक्स

  • तळलेले पदार्थ

  • पिझ्झा

  • चायनीज पदार्थ


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


World Heart Day 2023 : यंदा जागतिक हृदय दिनानिमित्त कोलेस्‍ट्रॉलवर नियंत्रण ठेवायचंय? 'हे' 5 सोपे उपाय फॉलो करा