Health Tips : सध्या सगळीकडे डेंग्यूच्या (Dengue) रोगाने कहर केला आहे. या रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे. राजधानी दिल्लीत डेंग्यूचा सर्वात गंभीर प्रकार असलेल्या डेन-2 चे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे डेंग्यू आणखी गंभीर होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली जातेय. या आजारापासून सर्वांनी सावध राहण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. योग्य वेळी उपचार न केल्यास ते जीवघेणाही ठरू शकतो. डेंग्यूच्या डासांची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.


डेंग्यूचा मुख्य वाहक एडिस इजिप्ती नावाचा डास आहे. हा एक अतिशय खास प्रकारचा डास आहे. 



  • हा एक अतिशय लहान आकाराचा डास आहे, ज्याची लांबी फक्त काही मिलीमीटर आहे.

  • या डासाचा रंग काळा आहे पण त्याच्या शरीरावर पांढर्‍या रंगाचे ठिपके देखील आहेत जे सहज ओळखण्यास मदत करतात. 

  • हा डास खूप वेगाने उडू शकतो आणि लांब अंतरापर्यंत पोहोचू शकतो. 

  • चावण्याची आणि रक्त शोषण्याची या डासाची खूप मजबूत क्षमता आहे.

  • हा डास दिवसा देखील सक्रिय असतो, बहुतेक सकाळी आणि संध्याकाळी हा डास चावतो, अंदाजे सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत हा डास चावण्याची शक्यता तीव्र असते.

  • तो कोणत्याही ठिकाणी, अगदी घरामध्येही चावू शकतो. 

  • या डासाचे आयुष्य साधारणपणे 2 ते 4 आठवडे असते. 


जाणून घ्या डेंग्यूचे डास दिवसा का सक्रिय असतात?



  • दिवसाच्या वेळी, हे डास अगदी सहजपणे मानव आणि प्राण्यांपर्यंत पोहोचतात.

  • दिवसा वातावरणात उष्णता असते ज्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान राखण्यास मदत होते. 

  • दिवसा जास्त वारा असतो जो या डासांसाठी अनुकूल असतो.

  • दिवसा जास्त व्यायाम आणि हालचालींमुळे, मानवी त्वचेला जास्त घाम येतो ज्यामुळे डास आकर्षित होतात.

  • दिवसभरात, डासांपासून दूर राहण्यासाठी मानव कमी काळजी घेतात, त्यामुळे हे डास जास्त चावतात. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : डेंग्यूचा संसर्ग वारंवार होऊ शकतो? हा संसर्ग कितपत घातक आहे? वाचा आरोग्य तज्ज्ञांचं मत