April Fools Day 2022 :  एप्रिल फूल (April Fools Day) फक्त भारतातच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. काही देशांमध्ये या दिवशी सुट्टीही असते. या दिवशी लोक एकमेकांची चेष्टा, थट्टा, मजा मस्ती करतात.cएकूणच काय तर प्रत्येकजण या दिवशी कोणत्याना कोणत्या मार्गाने समोरच्या व्यक्तीला एप्रिल फूल बनवत असतो.


एप्रिल फूल डेची सुरुवात कधी झाली ?


एप्रिल फूल दिन नेमका कधी साजरा करण्यात आला याबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती नाही. परंतु, या दिनाबाबत लोकांचा असा विश्वास आहे की, फ्रेंच कॅलेंडरमध्ये होणारा बदल हे एक एप्रिल फूल डे साजरा करण्यामागचं एक कारण असू शकेल. सर्वात प्रसिद्ध कथेनुसार, जुन्या काळात रोमन लोक नवीन वर्षाची सुरुवात एप्रिलपासून करत असत. तर मीडिल युरोपमध्ये नवीन वर्षाचा उत्सव 25 मार्च रोजी साजरा केला गेला. परंतु 1852 मध्ये पोप ग्रेगोरी आठवे यांनी ग्रेगोरियन कॅलेंडर जाहीर केली. त्यानंतर जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात झाली.


ग्रेगोरियन कॅलेंडर फ्रान्सने प्रथम स्वीकारले होते. परंतु लोकांच्या मते, युरोपमधील बर्‍याच देशांनी हे कॅलेंडर स्वीकारले नाही, तेव्हा बरेच लोक त्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते. ज्यामुळे लोक नवीन कॅलेंडरच्या आधारे नवीन वर्ष साजरे करू लागले. नवीन कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करणारे लोक जुन्या मार्गाने नवीन वर्ष साजरे करणारे लोक मूर्ख समजले गेले आणि त्यानंतर एप्रिल फूल साजरे करण्यास सुरुवात झाली.


दरम्यान, एप्रिल फूल दिन वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये एप्रिल फूल दिन फक्त दुपारपर्यंत साजरा केला जातो. तर जपान, रशिया, आयर्लंड, इटली आणि ब्राझीलमध्ये संपूर्ण दिवस एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha