RBI 87th Foundation Day : बॅंकांची बॅंक म्हणून रिझर्व्ह बॅंकेची ओळख आहे. आज भारतात जे काही बॅंकांचे व्यवहार चालतात ते याच बॅंकेच्या माध्यमातून केले जातात. भारतीय चलनांची निर्मिती करणे तसेच नोटा छपाई करणे हे रिझर्व्ह बॅंकेचं मुख्य कार्य आहे. भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली आणि चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे. आज रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचा (RBI) 87 वा वर्धापन दिन आहे. याच निमित्ताने जाणून घ्या भारतीय रिझर्व्ह बॅंकेचा इतिहास नेमका काय आहे. 


सर्वात आधी 1771 मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती. 1926 च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.


बऱ्याच काळासाठी चलन आणि बँकिंगमधील आंतर-कनेक्शन व्यापक प्रमाणात आकलन करता यावे यासाठी संसदेत 6 मार्च 1934 ला आर.बी.आय कायदा 1934 संमत करण्यात आला. आणि 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली.  भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांचे नियम धोरणाचे कार्य करते.    


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतीय रुपयाच्या जारी आणि पुरवठ्यासाठी आणि भारतीय बँकिंग प्रणालीचे नियमन यासाठी जबाबदार आहे. हे देशाच्या मुख्य पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन देखील करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कार्य करते. भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रा हा भारतीय रिझर्व बँकच्या विशेष विभागांपैकी एक आहे ज्याद्वारे ते भारतीय बँक नोटा आणि नाणी टाकतात.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मुख्य उद्देश :



  • भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.

  • भारताची गंगाजळी राखणे.

  • भारताची आर्थिक स्थिती राखणे.

  • भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा इतिहास :


1 एप्रिल इ.स.1935 रोजी भारतीय रिर्झव्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व बँक कायदा 1934 नुसार झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रचना आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘The Problem of Rupee' : It's Origin and it's Solution या पुस्तकातून घेतले. ह्या बँकेची संस्थापना 1926 च्या राॅयल संस्थेच्या शिफारसेच्या आधारे झाली. या बँकेचा मूळ शिक्का म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचे चिन्ह - म्हणजेच नारळाचे झाड आणि सिंह असे होते. पण त्या चिन्हात बदल करण्यात आले, आणि सिंहा ऐवजी भारताचा राष्ट्रिय प्राणि वाघ याचा चिन्हात समावेश झाला. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha