Women Health : "अगं.. तू हे काय करतेस? गर्भधारणा टाळण्यासाठी वारंवार गोळ्या घेतेस? पण तुला माहित आहे का? या गोळ्या शरीरासाठी कितपत हानीकारक आहे? नसेल माहित तर डॉक्टरांकडून जाणून घे.." गर्भधारणा टाळण्यासाठी महिला अनेकदा गर्भनिरोधक औषधं घेतात. मोठ्या संख्येने महिला या प्रकारच्या गोळ्या घेतात, ज्यांना "मॉर्निंग-आफ्टर पिल्स" असेही म्हणतात. गर्भधारणा टाळण्यासाठी हा एक तात्पुरता उपाय आहे.


 


इमर्जन्सी गोळ्या वारंवार घेणे धोकादायक


तुम्हाला माहित आहे का? शारिरीक संबंधानंतर 72 तासांच्या या गोळ्या आत घेतल्यास अनियोजित गर्भधारणा रोखण्यासाठी 95% पर्यंत प्रभावी ठरतात. मात्र महिला डॉक्टरांचा सल्ला न घेता ही औषधे घेत आहेत, ही चिंतेची बाब आहे. डॉक्टरांच्या मते, इमर्जन्सी गोळ्या वारंवार घेणे धोकादायक ठरू शकते, कारण या गोळ्या अचानक हार्मोन्सची पातळी वाढवू शकतात, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. ज्यामुळे अनियमित मासिक पाळी, मूड बदलणे, थकवा आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.



पौष्टिक कमतरता, अनियमित मासिक पाळी 


इमर्जन्सी गोळ्या शरीरातील आवश्यक पोषक तत्वे शोषून घेतात, ज्यामुळे व्हिटॅमिन बी 12 आणि लोहाची कमतरता निर्माण होते. त्याचबरोबर इमर्जन्सी गोळ्या वारंवार घेतल्याने गर्भधारणा रोखण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता असते. आपत्कालीन गोळ्या दीर्घकाळ घेतल्याने रक्ताच्या गुठळ्या, पक्षाघात आणि रोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आपत्कालीन गोळ्यांचा वापर तात्पुरता उपाय म्हणून केला पाहिजे. तसेच तुम्हाला गर्भनिरोधक गोळ्या सतत घ्यायच्या असल्यास, तुमच्या डॉक्टरांशी एकदा बोला आणि तुमच्या गरजेनुसार योग्य गर्भनिरोधक पद्धत निवडा. तज्ज्ञांच्या मते, जर शारीरिक संबंध असुरक्षितपणे केले जात असेल, तर अशा परिस्थितीत आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या 24 तासांच्या आत घेतल्या जातात. डॉक्टरांच्या मते, इमर्जन्सी गोळ्यांचा वापर कमी केला पाहिजे. अनेक महिन्यांत एक किंवा दोनदा इमर्जन्सी गोळ्या घेतल्याने मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि तुमचे आरोग्यही बिघडू शकते. गर्भधारणा टाळण्यासाठी महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित गर्भनिरोधक गोळ्या घ्याव्यात.


शारीरिक समस्या 


इमर्जन्सी गोळ्या घेतल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की इमर्जन्सी गोळी एक प्रकारची नैसर्गिक प्रक्रिया थांबवण्याचे काम करते. अशा परिस्थितीत तुमच्या शरीरात अनेक बदल होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते. इमर्जन्सी गोळी घेतल्याने काही महिलांना डोकेदुखी, ताप आणि इतर लक्षणे जाणवतात.



मासिक पाळी वेदना


इमर्जन्सी गोळ्या घेतल्यामुळे, तुमची पुढील मासिक पाळी लवकर किंवा उशिरा येते. याशिवाय इमर्जन्सी गोळी वारंवार घेतल्यामुळे तुमची मासिक पाळी देखील वेदनादायक होऊ शकते. याचा अर्थ असा की जेव्हा तुमची मासिक पाळी येते, तेव्हा तुम्हाला पोटदुखी होऊ शकते आणि चिंता देखील वाढू शकते.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Relationship Tips : 'कधीतरी पतीच्याही भावना समजून घ्या की...' नवऱ्याला पत्नीकडून नेमकं काय हवं असतं? 7 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या