Relationship Tips : नवरा-बायकोचं (Husband-Wife) नातं हे घट्ट असतं. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी आणि समजूतदारपणा असेल तरच हे नाते टिकते. नवरा आणि बायको दोघांनीही हे नाते जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे नातं दिवसेंदिवस कसे फुलत जाईल? यासाठी प्रत्येक जोडप्याने काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तसेच एका पत्नीच्या भावना समजून घ्या असं आपण नेहमीच म्हणतो. पण जर तुम्हाला तुमचे नाते मजबूत करायचे असेल तर तुम्ही तुमच्या पतीच्याही भावना समजून घेतल्या पाहिजे. अनेक वेळा नवऱ्याला काही वेगळी अपेक्षा असते. पण कधी कधी बायको त्याला समजू शकत नाही आणि नात्यात समस्या सुरू होतात. जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी...


 


पुरुषांना नात्यात काय हवं आहे?


आपण पाहतो की, कोणत्याही नात्यात पुरुषांना महिलांइतक्या सहजतेने आपले विचार मांडता येत नाहीत. हेच कारण आहे की अनेक वेळा पुरुषांना नात्यात काय हवे आहे हे समजत नाही. येथे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही गोष्टी घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही हे समजू शकाल की या नात्यात पुरुष जोडीदारांना पत्नीकडून काय हवंय?


 


आदर


पुरुषांची सर्वात महत्त्वाची अपेक्षा पत्नीकडून ही असते की, पत्नीने त्यांचा आदर करावा असे वाटते. पती कोणत्याही कामात चांगला असो वा नसो, त्याच्या पत्नीने त्याला पूर्ण आदर दिला पाहिजे. जर तुम्हाला तुमचे नाते मजबूत राहायचे असेल तर हे खूप महत्वाचे आहे. अनेकवेळा काही कारणास्तव महिलांना हे जमत नाही, मग नात्यात अंतर वाढू लागते.


 


पतीला हिरो म्हणून पाहायला काय हरकत आहे?


आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पतींना नेहमीच पत्नींनी छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांचे कौतुक करावे असे वाटते. कोणत्याही कामासाठी त्यांची प्रशंसा आणि प्रोत्साहन द्या. जेव्हा महिला कोणत्याही कौटुंबिक कार्यासाठी त्यांच्या पतीची प्रशंसा करतात तेव्हा त्यांना ते आवडते.


 


भावना समजून घ्या...


पुरुषांना त्यांच्या पत्नींनी नेहमी त्यांच्या भावनांचा आदर करावा असे वाटते. कोणत्याही विषयावर त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यांना पाठिंबा द्या. कोणतीही अडचण आल्यास त्यांच्यासोबत बसून त्यांना समजावून सांगा आणि त्यांच्या समस्या समजून घ्या.


 


आधार


पती पत्नीला प्रत्येक पावलावर साथ देतात, त्यांनाही तेच हवे असते. घरगुती समस्या असो किंवा कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या, आपल्या पत्नीने आपल्यावर विश्वास ठेवावा आणि त्याच्याशी प्रामाणिक राहावे असे पतीला वाटते. कोणत्याही अडचणीत पत्नीने पतीला साथ दिली तर नाते खूप घट्ट होते.


 


पतीपासून गोष्टी लपवून ठेवू नका


पतीची इतकीच अपेक्षा असते ती म्हणजे पत्नीने घरातील वातावरण इतकं चांगलं ठेवलं पाहिजे, जेणेकरून तुमचा नवरा त्याच्या सर्व समस्या तुमच्याशी शेअर करू शकेल. अशावेळी पती आपल्या भावना पत्नीसमोर मोकळ्या मनाने व्यक्त करू शकतो. त्यावेळी तुम्ही तुमच्या पतीला काही बोललात आणि त्याचा गैरसमज होईल, असे होऊ नये.


 


नात्यात कमिटमेंट


नात्याबद्दल प्रामाणिक असणाऱ्या लोकांचे संबंध दीर्घकाळ टिकतात. निरोगी नात्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. कोणत्याही नात्यात फक्त महिलांनाच नाही तर पुरुषांनाही कमिटमेंट हवी असते.


 


क्वालिटी टाइम


पतीला पत्नीकडून वेळ हवा असतो. क्वालिटी टाइम म्हणजे एकत्र बसून समस्या सोडवणे असा नाही. याचा अर्थ तुम्ही दोघे एकत्र बसून सुंदर आठवणी निर्माण करा. कोणत्याही नात्यात, पुरुष जोडीदारांनाही क्वालिटी टाइम घालवायचा असतो.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Relationship Tips : लोक घटस्फोट का घेतात? घटस्फोटामागील मुख्य कारण काय ? मोटिव्हेशनल स्पीकर सिस्टर शिवानी म्हणतात...