Breast Cancer: भारतातील महिलांमध्ये दर ४ मिनिटांनी एका महिलेला स्तनाचा कर्करोग होतो आणि दर ८ मिनिटांनी एका महिलेचा स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू होतो, असं तज्ञांचं म्हणणं आहे. तरुण महिलांनांही हा कर्करोग होण्याची संख्या आता वाढली आहे. दरम्यान,  दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढतो असं सूचवणारे मर्यादित पुरावे समोर आले होते.


भारतात दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करण्याचं प्रमाण तसं मोठं. बहुतांशी कुटुंबांमध्ये घरात दुधदुभतं असणं हे चांगलं समजलं जातं. गरोदर महिलांना तर दररोज दुध पिण्यास सांगितले जाते. पण कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत समजले जाणारे दुध कॅन्सरचे कारण बनू शकते का?


चार वर्षापूर्वी आलेल्या अभ्यासात काय समोर आले?


काही वर्षांपूर्वी दुध किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो असे सूचवणार एक अभ्यास समोर आला होता. यात अमेरिकेच्या ५३ हजार महिलांवर प्रयोग करण्यात आला होता. ज्यात ज्या स्त्रिया सोया, दुग्धजन्य पदार्थ आणि जीवनशैलीच्या सवयींविषयी सांगितले तेंव्हा त्या सर्व महिला कर्करोगमुक्त होत्या पण त्यानंतर साधारण ८ वर्षांनी त्यातील १०५७ महिलांना स्तनाचा कर्करोग झाला होता.


दुधामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो का?


परंतू या अभ्यासात दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळेच त्यांना स्तनाचा कर्करोग झाला असाकोणताही स्पष्ट पुरावा नव्हता. त्यामुळे दुधामुळे कर्करोगाचा धोका वाढतो असा कोणताही पुरावा आढळला नाही. नॅशनल ब्रेस्ट कॅन्सर फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार दुग्धजन्य किंवा दुधाचा स्तनाच्या कॅन्सरचा धोका वाढवण्याशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा समोर आला नसल्याचं म्हटलंय.दुधाचे सेवन कॅल्शियमचा चांगला स्त्रोत


दुध हा कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे, जो हाडांची घनता टिकवून ठेवण्यास मदत करण्याबरोबरच हाडे आणि दात तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे जो स्नायू तयार करण्यास किंवा दुरुस्त करण्यास मदत करतो. दुग्धजन्य पदार्थांमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस सारख्या आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. जवळजवळ सर्व दूध व्हिटॅमिन डीने मजबूत केले जाते, जे कॅल्शियम शोषण्यास मदत करते.


हा आजार पुन्हा कोणाला होऊ शकतो?


या आजाराची पुनरावृत्ती अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की रुग्ण उपचाराच्या वेळी कोणत्या अवस्थेत होता, त्याची गाठ 5 सें.मी.पेक्षा जास्त असते का, काखेत गाठ दिसली, आणि जर उपचार योग्य प्रकारे केले गेले नाहीत, तर त्या रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.


या आजाराची पुनरावृत्ती कशी टाळावी?


नियमित पाठपुरावा करा, तुम्ही बरे झाले असाल तरीही तुमचे सर्व रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.पण तुम्हाला दोन वर्षांतून दर 3 महिन्यांनी, 5 वर्षांत दर 6 महिन्यांनी डॉक्टरांना भेटावे लागेल, डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या आणि उपचार गांभीर्याने घ्यावे लागतील.याशिवाय संतुलित आहार, शारीरिक हालचाली आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकडे लक्ष दिले पाहिजे.


हेही वाचा:


Women Health : महिलांनो इथे लक्ष द्या..! Breast Cancer एकदा बरा झाल्यानंतर पुन्हा होऊ शकतो का? काय काळजी घ्याल? डॉक्टर सांगतात...