Green Tea For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी लोक भरपूर ग्रीन टी पित असतात. फिटनेसबाबत सतर्क असणारी मंडळी ग्रीन टी ग्रीन टी पित असतात. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यासदेखील मदत होते. काही लोकांना ग्रीन टी पिण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतरांना पाहून कधीही ग्रीन टी पिण्यास सुरुवात करू नये. याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 


ग्रीन टीचे फायदे 
वजन कमी करण्यास मदत
ग्रीन टी तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. त्यात अँटिऑक्सिडंट्स असतात. ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. ग्रीन टी प्यायल्यानंतर व्यायाम केल्याने फॅट ऑक्सिडेशन वाढते, ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. मात्र, या काळात तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.


उत्तम त्वचेसाठी फायदेशीर
ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेच्या खराब झालेल्या पेशी सुधारण्यास मदत करतात. यामुळे त्वचेवर जळजळ होण्याची समस्या दूर होते, तसेच मुरुमांची समस्याही दूर होते.


मधुमेहासाठी फायदेशीर
वजन कमी करण्यासोबतच ग्रीन टी मधुमेहासाठी देखील उपयोगी ठरते. अँटी इन्फ्लेमेंत्री गुणधर्म असल्यामुळे मधुमेहाच्या रोग्यांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.


हातापायाच्या व सांध्याच्या संधिवातासाठी
हातापायाच्या व सांध्यांच्या संधिवातासाठी ग्रीन टी ही लाभकारी आहे. तसेच ग्रीन टी घेतल्यानंतर जो त्रास संधिवातामध्ये होत असतो त्यातही आराम मिळतो म्हणून साधं पाणी पिण्यापेक्षा ग्रीन टी पीने हे संधिवात असणाऱ्यांसाठी उत्तम असते.


हृदयासाठी
हृदयाच्या आरोग्यासाठी म्हणजेच शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम ग्रीन टी करत असते. त्यामुळे अति लट्ठपणा तर कमी होतोच परंतु त्यासोबतच धमन्यांमध्ये जमा होणारे कोलेस्ट्रॉल तयार होत नाही अथवा कमी प्रमाणात निर्माण होते आणि यामुळे रक्तप्रवाह सुरळीत चालतो व हृदयाचा धोका कमी होतो.


तनाव कमी करते
ज्या लोकांना जास्त तणाव व थकवा येत असतो, त्यांनी दिवसातून कमीत कमी एकदा तरी ग्रीन टी घ्यावी. कारण ग्रीन टी तनाव कमी करते सोबतच सकाळी ग्रीन टी चे सेवन केल्यास थकवा देखील कमी येतो आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या


Skin Care Tips: मुलायम आणि चमकदार त्वचा हवीये? वापरा अ‍ॅप्पल फेस पॅक, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत


Calcium Rich Food : कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश


Diabetes Control : मुळा, काकडी, टोमॅटोच्या रसाने हिवाळ्यात रक्तातील साखर नियंत्रित करा, दीर्घकाळ राहाल निरोगी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha