Weight Loss Tips : वजन वाढणे ही सध्या अनेकांसाठी सर्वात मोठी समस्या बनली आहे. वाढलेलं वजन किंवा लठ्ठपणामुळे (Obesity) अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. जास्त वजनामुळे हृदयरोग (Heart Disease), मधुमेह (Diabetic), मेटाबॉलिक सिंड्रोम यांसारख्या अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो, असं संशोधनात आढळून आलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही दिला जातो. जर तुम्हीही वाढलेल्या वजनाच्या समस्येने त्रस्त असाल तर वेळीच त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. वाढलेल्या वजनाचे दुष्परिणाम सर्व वयोगटातील लोकांवर दिसून येतात.


वजन कमी करण्यासाठी अशाप्रकारे नाश्ता करा 


वजन कमी करायचं असेल तर व्यायाम आणि आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम करणंच नाही तर, आहारात सुधारणा करणं सर्वात महत्त्वाचं असल्याचं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. वजन वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे जास्त कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये काही बदल करु शकता, यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल.


पौष्टिक नाश्ता आवश्यक


ब्रेकफास्ट न्याहारी हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार मानला जातो आणि वजन कमी करण्यासाठी पौष्टिक नाश्ता करणं देखील महत्वाचं आहे. न्याहारी निरोगी आणि पौष्टिक असणं महत्वाचं आहे, कारण त्याचा तुमच्या चयापचयवर परिणाम होतो. रात्री झोपल्यानंतर आपली चयापचय क्रिया मंदावते, यानंतर सकाळी उठल्यावर तुमच्या शरीराला पुन्हा सक्रिय होण्यासाठी पोषक तत्वांची गरज असते. चयापचय क्रिया सकाळी सर्वोत्तम मानली जाते, त्यामुळे तुम्ही सकाळी जो नाश्ता करता, त्यांचा शरीरावर थेट परिणाम होतो. आहारतज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नाश्त्यातील पौष्टिकतेची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी नाश्त्यामधून काही अतिरिक्त कॅलरीज असलेले पदार्थ काढून टाकणंही आवश्यक आहे.


ब्रेड


बहुतेकांसाठी व्हाईट ब्रेड हा नाश्त्याचा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. व्हाईट ब्रेड सहज उपलब्ध होतो आणि त्याने पोटही भरते. पण यामुळे शरीराला नुकसान होऊ शकतं. पांढऱ्या ब्रेडमध्ये फायबर आणि पोषक तत्वे फारच कमी प्रमाणात असतात आणि कॅलरी देखील जास्त असतात, ज्यामुळे शरीरात चरबी जमा होण्याचा धोका वाढू शकतो आणि यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. हे पचनासाठी जड जात आणि याच्या सेवनाने वजन वाढण्याचा धोका वाढतो.


गोड पदार्थ


नाश्त्यामध्य गोड पदार्थ खाणे हे वजन वाढण्याचं कारण ठरु शकतं. आहारतज्ज्ञांच्या मते, ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि प्रथिने-फायबरचे प्रमाण कमी असते, असे पदार्थ नाश्त्यामध्ये खाणं टाळा. या पदार्थांमुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका जास्त असतो. नाश्त्यामध्ये या गोष्टी पदार्थांचा समावेश केल्यास वजन वाढण्याचा धोका वाढतो. मफिन्स, पेस्ट्री, गोड ब्रेड यांसारख्या गोष्टींमध्ये फॅट आणि कॅलरीज जास्त असतात. वजन कमी करायचं असेल तर नाश्त्यातून हे पदार्थ वगळा.


पॅकबंद फळांचा रस


फळांचा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण पॅकेज बंद फळांचा रस हानिकारक ठरू शकतो. पॅक केलेले फळांचे रस पिल्याने तुमच्या आरोग्यासाठी धोका निर्माण करतात. पॅकबंद ज्यूसमध्ये साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह असतात, त्यांच्या सेवनाने शरीरातील चरबीचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. यामुळे रक्तातील साखर देखील वाढू शकते. अधूनमधून पॅकेज बंद ज्यूस पिणं ठिक आहे, पण नाश्त्यासाठी हा आरोग्यदायी पर्याय नाही. त्याऐवजी तुम्ही नाश्त्यामध्ये फळांचा समावेश करा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Belly Fat : पोट सुटलंय? आजचं 'या' सवयी सोडा, पोटावरील चरबी वाढण्याची कारणं जाणून घ्या