Ayurveda Tips For Heart Health : सध्या प्रत्येक जण व्यस्त जीवन (Busy Lifestyle) जगताना पाहायला मिळत आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष करतो आणि याचा आपल्या आरोग्यावर दिर्घकाळ (Health Tips) परिणाम दिसून येतो. याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या हृदयावर (Heart) होतो. अलिकडच्या काळात हृदयविकाराचं (Heath Health Tips) प्रमाण वाढलं आहे. वृद्धांसोबतच तरुणांमध्येही हृदयविकाराचं (Heart Disease) प्रमाण वाढताना दिसत आहे. तरुण वयात (Youngeters) अनेकांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack), उच्च रक्तदाब (High Blood Pressure), कोलेस्टेरॉल (Cholesterol) यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी आयुर्वेदानुसार (Ayurveda) काही नियम आणि पद्धती अवलंबल्यास हृदयविकाराचा धोका बऱ्याच अंशी कमी करता येतो.
हृदय निरोगी ठेवायचंय? मग 'हे' वाचा
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. फास्ट फूड, बाहेरचे अन्नपदार्थ, ताणतणाव, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पूर्वी 60-70 वर्षांच्या वयात होणारे आजार आता 30-40 वर्षांच्या वयातही दिसून येत आहेत. यामुळे वेळीच तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी 'या' आयुर्वेदिक पद्धतींचा वापर करा
- हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आयुर्वेदानुसार, आपण आपल्या रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि काजू यांसारख्या सर्व प्रकारच्या पौष्टिक घटकांचा समावेश केला पाहिजे.
- या सर्व गोष्टींमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच, अतिरिक्त चरबी, मीठ आणि साखरेचे सेवन मर्यादित असावे कारण यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
- चालणे, जॉगिंग, सायकलिंग, योगासने, प्राणायाम यासारखे व्यायाम हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत. दैनंदिन दिनचर्येत व्यायामाचा समावेश करणे खूप गरजेचं आहे.
- दररोज ध्यान आणि योगासने केल्याने मनाला शांती मिळते. यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. याशिवाय कुटुंब आणि मित्रांसोबत सकारात्मक वेळ घालवल्याने तणाव दूर राहतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :