Weight Loss : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय. अनेकजण लठ्ठपणाचे शिकार झाले आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते प्रत्येक व्यक्तीसाठी चयापचय दर भिन्न असतो. मंद चयापचयमुळे, कॅलरीज लवकर बर्न होत नाही, ज्यामुळे वजन कमी करण्यात अडचण येते. त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात काही बदल करून तुम्ही तुमची Metabolism गती वाढवू शकता. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काय सुधारणा करू शकता ते जाणून घ्या..
मेटाबॉलिजम म्हणजे काय?
मेटाबॉलिजम म्हणजेच चयापचय ही अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे शरीर अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करते. प्रत्येक व्यक्तीचा चयापचय दर भिन्न असतो, जो त्याची जीवनशैली, आहार आणि आनुवंशिकता यावर अवलंबून असतो. त्यामुळे अनेक वेळा खराब जीवनशैली आणि अनारोग्यदायी आहारामुळे चयापचय मंदावतो. यामुळे तुमचे शरीर कॅलरी खूप हळू बर्न होतात आणि शरीरातील चरबीचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे वजन वाढवण्यात किंवा वजन कमी करण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, तुमचा मेटाबॉलिजम रेट वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही लहान सुधारणा करू शकता. तुम्ही तुमचा मेटाबॉलिक रेट कसा वाढवू शकता ते जाणून घ्या..
शारीरिक क्रिया
नियमितपणे चालणे, धावणे, व्यायाम, पोहणे, नृत्य किंवा योगा यासारख्या क्रिया करून तुम्ही तुमचा मेटाबॉलिजम रेट वाढवू शकता. शारीरिक क्रिया करण्यासाठी तुम्हाला उर्जेची आवश्यकता असते आणि त्यामुळे चयापचय वाढते.
प्रथिने खा
कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सपेक्षा प्रथिने पचायला जास्त वेळ घेतात, ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे तुम्ही कमी कॅलरी वापरण्यास सक्षम असता. याव्यतिरिक्त, प्रथिने लेप्टिन आणि घरेलिन हार्मोन्सचे नियमन करण्यास मदत करते, जे भूक नियंत्रित करते. त्यामुळे मसूर, बीन्स, फॅटी फिश आणि चिकन यांसारख्या पातळ प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
भरपूर झोप घ्या
तुमच्या मेटाबॉलिजम प्रक्रियेसाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे. झोपेच्या कमतरतेमुळे मेटाबॉलिजम प्रक्रिया मंदावते आणि शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते. त्यामुळे रोज किमान 7-8 तासांची झोप घ्या.
संतुलित आहार घ्या
शरीर निरोगी ठेवण्यासाठी, आपल्या आहारात शक्य तितक्या पोषक तत्वांनी युक्त फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य समाविष्ट करा, जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा.
हायड्रेटेड राहा
पाण्याची कमतरता तुमचा मेटाबॉलिजम कमकुवत करू शकते. याशिवाय शरीरातील डिटॉक्सिफिकेशनमध्ये पाणी महत्त्वाची भूमिका बजावते, जे चयापचय वाढवते. अशा परिस्थितीत, नेहमी स्वतःला हायड्रेटेड ठेवा आणि दररोज किमान 2-3 लिटर पाणी प्या.
हेही वाचा>>>
Food : वेट लॉस करताना गोड खाण्याची इच्छा झालीय? तर 'या' स्वीट डिश बिनधास्त खा, वजन वाढणार नाही
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )