Watermelon Seeds Health Benefits : कलिंगड (Watermelon) आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कलिंगडाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कलिंगड नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे आढळतात. ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. पण कलिंगडाप्रमाणेच कलिंगडाच्या बियांचेही अनेक गुणकारी फायदे आहेत. तुम्ही कलिंगड खाताना बिया फेकून देत असाल, तर ही बातमी तुम्ही नक्की वाचायला हवी.


Watermelon Health Benefits : कलिंगडाचे फायदे


कलिंगडामध्ये 90 टक्क्यांहून अधिक प्रमाणात पाणी असते. कलिंगड व्हिटॅमिन ए, बी 6,व्हिटॅमिन सीचा चांगला स्त्रोत आहे. याशिवाय कलिंगडामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, फोलेट आणि कॅल्शियम यांसारख्या खनिजेही मोठ्या प्रमाणात आढळतात. डिहायड्रेशन रोखण्याबरोबरच कलिंगड वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. 


Watermelon Seeds Health Benefits : अनेक पोषकतत्वांनी युक्त कलिंगडाच्या बिया


कलिंगडाच्या बियांमध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नीशियम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, झिंक, तांबे, मॅगनीज, फोलेट, फॅटी ॲसिड ही पौष्टिक तत्वे आढळतात. 


कलिंगडाच्या बियांचे 'हे' फायदे


Watermelon Seeds Health Benefits : मधुमेहावर गुणकारी 


कलिंगडाच्याच्या बिया उत्तम अँटीडायबेटिक आहेत. यामुळे ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत होते. कलिंगडाच्या बिया ग्लायकोजेनला सकारात्मक पद्धतीने साठवण्यास मदत करतात. त्यामुळे काही संशोधनानुसार, असा दावा करण्यात आला आहे की, मधुमेहाच्या उपचारांमध्ये कलिंगडाच्या बिया अतिशय गुणकारी ठरू शकतात. जेव्हा शरीरात ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते तेव्हा ते ग्लायकोजेनच्या रूपात शरीरात साठवले जाते, यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. याशिवाय कलिंगडाच्या बियांमध्ये ओमेगा -3 आणि ओमेगा -6 फॅटी ऍसिडस असतात. हे घटक टाईप-2 मधुमेहाला प्रतिबंधित करून धोका कमी करण्यास मदत करतात.


Watermelon Seeds Health Benefits : मेंदूचे आरोग्य सुधारते


मेंदूच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी पोषक घटकांची आवश्यकता असते. शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असल्यास मेंदूची लक्षात ठेवण्याची आणि नवीन शिकण्याची क्षमता कमी होऊ लागते. मेंदूशी संबंधित या आजाराचे नाव अल्झायमर आहे. जर मेंदूशी संबंधित ही समस्या सुरुवातीच्या टप्प्यात आढळून आली, तर मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचे सेवन करून ही समस्या वाढण्यापासून रोखली जाऊ शकते. कलिंगडाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे कलिंगडाच्या बियांचे सेवन केल्यास मेंदूचे आरोग्य सुधारते.


How to Consume Watermelon Seeds : कलिंगडाच्या बियांचे सेवन कसे करावे?


तुम्ही कलिंगडाच्या बिया चावून खाऊ शकता. याशिवाय तुम्ही कलिंगडाच्या बियांची पावडर पाण्यासोबत घेऊ शकता. तसेच कलिंगडाच्या बियांच्या चहा देखील पिऊ शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.