Watermelon Seeds : कलिंगडाच्या बियाही आरोग्यासाठी गुणकारी; वाचा आश्चर्यकारक फायदे
कलिंगड आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे, हे आपणा सर्वांनाच माहित आहे. कलिंगडामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते, त्यामुळे याची शरीर हायड्रेड ठेवण्यास मदत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण कलिंगडासोबतच त्याच्या बियांमध्येही आहेत अनेक पोषकतत्वे आहेत, हे तुम्हाला माहित आहे का?
आपण नेहमी कलिंगड खाल्ल्यानंतर कलिंगडाच्या बिया फेकून देतो. पण असं करण्याआधी कलिंगडाच्या बियांचे भन्नाट फायदे जाणून घ्या.
कलिंगडाच्या बिया अनेक पोषक तत्वांनी युक्त असतात. या बियांचे वरचे कवच थोडे कठीण असते. या बियांचे सेवन केल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो.
कलिंगडाच्या बियांमध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नीशियम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, झिंक, तांबे, मॅगनीज, फोलेट, फॅटी ॲसिड ही पौष्टिक तत्वे आढळतात.
पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने आणि कॅल्शियम समृद्ध आहार घेणे हृदयासाठी उत्तम मानला जातो. कलिंगडाच्या बिया यांचा उत्तम स्त्रोत आहे.
अनेक पोषक तत्वांनी युक्त कलिंगडाच्या बियाचे सेवन केल्याने हृदयाच्या समस्या दूर ठेवण्यास आणि त्यापासून तुमचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.
कलिंगडाच्या बिया रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. यामुळे शरीराला रोगांपासून संरक्षण मिळते आणि त्यांच्याशी लढण्यासाठी मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.