Twins Baby from Different Father : वैज्ञानिक जगातील चमत्कार म्हणावा अशी घटना समोर आली आहे. एका तरुणीने जुळ्या बाळांना जन्म दिला पण या जुळ्या बाळांचे वडील मात्र वेगवेगळे निघाले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे. हो, पण हे शक्य आहे आणि खरंही आहे. ब्राझीलमध्ये 19 वर्षांच्या तरुणीला जुळी मुले झाली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे जुळ्या मुलांचे वडील एक नाही तर दोन आहेत. या घटनेमुळे डॉक्टरही चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत. कोंडी झाली आहे. डॉक्टरांनी मुलांची डीएनए चाचणी केल्यावर ही धक्कादायक बाब समोर आली आहे.


जुळ्या बाळांचे वडील वेगवेगळे


जुळ्या बाळांचे वडील वेगवेगळे आहेत. हे समजल्यानंतर जुळ्या मुलांना जन्म देणारी आईही थक्क झाली. आपल्या आयुष्यात असे काही घडू शकते याचा विचारही या तरुणीने आयुष्यात कधीच केला नव्हता. डॉक्टरांनी सांगितले की, अशी घटना लाखात एक वेळा घडते. अशी विचित्र घटना वैद्यकीय क्षेत्रात क्वचितच पाहायला मिळते, त्यामुळे या घटनेला वैज्ञानिक जगातील चमत्कार म्हणता येईल.


ब्राझीलमध्ये घडली घटना


ही घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. एका 19 वर्षीय तरुणीने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. बाळांचा पहिला वाढदिवसस जवळ आला तेव्हा या आईने बाळांचे वडील कोण आहेत, याबद्दल विचार करू लागली. याचा शोध घेण्यास सुरुवात केली. बाळाचे वडील कोण याबाबत तिच्या मनात संभ्रम होता, हा संभ्रम दूर करण्यासाठी या तरुणीने पॅटरनिटी टेस्ट म्हणजे पितृत्व करण्याचे ठरवले. 


डीएनए चाचणीमध्ये समोर आली धक्कादायक बाब


त्यानंतर या तरुणीने आपल्या बाळाचे वडील कोण असू शकता या शक्यतेवरून आधारे संबंधित पुरुषांचे डीएनए गोळा केले आणि ते डीएनए तपासणीसाठी पाठवले. डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतर तरुणीसह डॉक्टरही हैराण झाले. डीएनए चाचणीमध्ये स्पष्ट झाले की, या जुळ्या बाळआंचे वडील वेगवेगळे आहेत. या डीएनए तपासणीमध्ये जुळ्या बाळांमधील एका बाळाचा डीएनए पुरुषांसोबत जुळला पण दुसऱ्या बाळाचा नाही. 


तरुणीचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध


हे कसे घडले असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. ही घटना वैज्ञानिक जगात क्वचितच घडते. जुळ्या बाळांच्या आईने स्थानिक मीडियाला प्रतिक्रिया देताना सांगितले की, मला आठवले की माझे दुसर्‍या पुरुषासोबतही संबंध होते. मी त्याला डीएनए चाचणीसाठी बोलावले. त्याचा डीएनए दुसऱ्या बाळासोबत जुळला. डीएनए रिपोर्ट बघून मी आश्चर्यचकित झाले. हे होऊ शकते हे मला माहीत नव्हते. माझ्यासोबत असे घडले, असे मला कधीही वाटले नव्हते.'


काय सांगत विज्ञान?


वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार, या प्रकरणाला शास्त्रज्ञांनी 'हेटेरो पॅरेंटल सुपरफेकंडेशन' (Heteropaternal Superfecundation) असं म्हटलं जातं. एका मासिक पाळी चक्रादरम्यान दुसऱ्या अंडपेशीची निर्मिती केली जाते. संभोगादरम्यान ही अंडपेशी दुसऱ्या पुरुषाच्या शुक्राणूसोबत मिसळते तेव्हा अशी घटना घडते.