Vitamin D News : हाडांसाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी Vitamin D फायद्याचे असते. त्याशिवाय शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेटचे प्रमाणही Vitamin D मुळे नियंत्रित राहते. ज्या व्यक्तीच्या शरिरात Vitamin D चे प्रमाण योग्य असते, त्यांना हृदयासंदर्भात आजार होण्याची शक्यता कमी असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नव्या रिसर्चनुसार Vitamin D च्या सप्लिमेंट्समुळे वयोवृद्ध लोकांमध्ये हृदयारोगाचा धोका कमी होतो. 21 हजार लोकांवर यासंदर्भात रिसर्च करण्यात आला. या सर्वांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. या सर्वांना पाच वर्षांपर्यंत Vitamin Dचे सप्लिमेंट्स देण्यात आले. त्यानंतर Vitamin D च्या सप्लिमेंट्समुळे हृदयासंदर्भात आजार कमी होतात, असे समोर आले. बीएमजेमध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी वृद्ध प्रौढांना व्हिटॅमिन डीचा महिन्याला एक डोस दिल्याने प्रमुख हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटनांचे दर बदलतात की नाही हे समोर आले. यामध्ये सकारात्मक परिणाम दिसले.
ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी 8-9 nmol/L पर्यंत असते, त्यांचे शरीर कमकुवत होते, त्यांना थकवा येतो, चिडचिडेपणा येतो, हाडे कमकुवत होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. प्रत्येकवर्षी हृदयासंदर्भात आजारामुळे जगभरात तब्बल 17.9 मिलियन लोकांचा मृत्यू होतो. गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्येही हृदयासंदर्भात आजारात वाढ झाली आहे. कोरोना महामारीनंतर युवा वर्गातही हृदयरोगाचं प्रमाण वाढले आहे. हा एक चिंतेचा विषय ठरला आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या मते, अनेक निरीक्षणात्मक अभ्यासांनी व्हिटॅमिन डी पातळी आणि CVD जोखीम यांच्यातील दुवा हायलाइट केला आहे. तथापि, यादृच्छिक नियंत्रित चाचण्यांमध्ये कोणतेही पुरावे आढळले नाहीत की व्हिटॅमिन डी सप्लीमेंट्स हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटनांना प्रतिबंधित करतात, शक्यतो चाचणी डिझाइनमधील फरकांमुळे परिणामांवर परिणाम होऊ शकतो.
Vitamin D कमी असल्याची लक्षणे कोणती ?
1. स्नायू कमकूवत झाले.
2. हाडे दुखतात
3. सांधे दु:खी
4. वारंवार आजारी आणि संक्रमित होणे
5. सतत थकवा जाणवणे
6. पाठदुखी
7. केस गळती
शरीराला किती व्हिटॅमिन डी आवश्यक आहे?
आपल्या शरीरातील दात, हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळायला हवे. शरीरातील कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे जीवनसत्त्व करते. एका निरोगी व्यक्तीला एका दिवसात 37.5 ते 50 mcg व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. तर, वाढत्या मुलांना दररोज किमान 25 mcg ची गरज असते. व्हिटॅमिन डीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहते.
सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त, व्हिटॅमिन डी चे इतर स्त्रोत :
'या' गोष्टी खाल्ल्याने व्हिटॅमिन-डी पूर्ण होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अंडी
गाईचे दूध
मशरूम
मासे
व्हिटॅमिन डी पूरक
तृणधान्ये आणि ओटचे जाडे भरडे पीठ
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.