Indian Spices And Their Benefits : जगभरात भारत (India) मसाल्यांमुळेही (Spices) खास ओळखला जातो. भारतीय मसाल्यांना जगभरात मागणी आहे. भारतील मसल्यांना कोणतीही तोड नाही. हे मसाले जेवणाची चव वाढवतात, यासोबतच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. भारतीय मसाल्याचं अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे अनेक आजारांपासून सुटका होते. हे मसाले आणि त्यांचे औषधी फायदे याबाबत सविस्तर माहिती वाचा.


हळद


हळदीमध्ये कर्क्युमिन आढळतं. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी संयुग आहे. संशोधनानुसार, कर्क्युमिन संधिवात, हृदयरोग आणि काही कर्करोग यांसारख्या जुनाट रोगांवर मात करण्यास मदत करू शकते.


दालचिनी


दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. याचे सेवन मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या व्यक्तींसाठी ते फायदेशीर ठरते. दालचिनी शरीरावरील सूज कमी करण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयाच्या आरोग्यास सुधारण्यासाठी फायदेशीर आहे.


काळी मिरी


काळी मिरी खाण्याचेही अनेक फायदे आहेत. काळी मिरीमध्ये पायपरिन (Piperine) हे महत्वाचे अँटी-ऑक्सिडंट असते. हे अन्नाचे पचन करण्यास मदत करते आणि कोलेस्टेरॉल कमी करते. यामुळे ब्लड शुगर कमी करण्यास मदत होते. तसेच हे मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त आहे.


वेलची


वेलची त्याच्या एक वैशिष्ट्यपूर्ण सुगंध आणि चव यासाठी ओळखली जाते. पण याचे औषधी गुणधर्मही आहेत. वेलची पचनास मदत करण्यासाठी आणि पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी पारंपारिक उपाय आहे. संशोधनाममध्ये याचे आरोग्यदायी फायदे समोर आलं आहेत. वेलचीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. यामध्ये कॅल्शियमसारखे पोषक घटक असतात. पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. इतकंच नाही तर, यामुळे हृदयाचे आजारही टाळता येतात.


आलं


आल्याचा वापर त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी फार पूर्वीपासून केला जात आहे. आलं संयुगे, जिंजरोल्स आणि शोगोल्स, शक्तिशाली दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत. आलं सामान्यतः मळमळ कमी करण्यासाठी, अपचन कमी करण्यासाठी वापरलं जातं. स्नायूचं दुखणं कमी करण्यासाठी हे गुणकारी आहे. आलं श्वासोच्छवासाच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी देखील ओळखलं जातं.


मेथी


मेथी हा भारतीय स्वयंपाकघरातील खास मसाला आहे. त्यामध्ये फायबर आणि ट्रायगोनेलिनसारखे संयुगे असतात, हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. यामुळे मधुमेह रुग्णांसाठी हे वरदान ठरतं. मेथी कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास, स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये दूध उत्पादन वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी फायदेशीर आहे.


जिरे


भारतीय मसाल्यांमधील जिरे पचनास मदत करते. जिरे पाचक एन्झाईम्स तयार करण्यात मदत करते. यामुळे पचनास मदत होऊन गॅस्ट्रोइंटेस्टाइन या सारख्या पचनासंबंधित रोगांपासून आराम मिळू शकतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


संबंधित इतर बातम्या :


Weight Loss Formula : वजन कमी करायचंय? Water Fasting नेमकी पद्धत, फायदे आणि तोटे; सविस्तर वाचा