Food To Avoid After Drinking : विशेषत: तरुणांमध्ये दारू (Alcohol) पिण्याचा कल सध्या खूप वाढला आहे. मद्यपान करणाऱ्यांसाठी फक्त एक निमित्त आवश्यक आहे, कारण आजकाल दारू पिणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. बाजारात दारूचे इतके प्रकार उपलब्ध आहेत की प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार दारू प्यायला आवडते. घरातील पार्टी, बार, पब किंवा हॉटेलमध्ये दारूसोबत अनेक खाद्यपदार्थही दिले जातात आणि लोकही ते खातात. पण तुम्हाला माहित आहे का की, असे काही खाद्यपदार्थ आहेत जे दारू पिल्यानंतर किंवा दारूसोबत खाऊ नयेत. यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
काजू-शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते
अनेकदा लोकांना दारू पिताना शेंगदाणे किंवा काजू खाणे आवडते. पण तेआरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. दारू प्यायल्यावर लगेच हे दोन्ही पदार्थ खाऊ नये. ते खाण्यास मनाई आहे कारण यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. जे शरीरासाठी खूप हानिकारक आहे.
सोडा किंवा थंड पेय शरीराकरता धोकादायक
जर तुम्ही सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्समध्ये मिसळून दारू प्यायली तर हे सर्व तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. म्हणूनच तुम्ही अल्कोहोलमध्ये केवळ पाणी किंवा बर्फ मिसळून पिऊ शकता.
मद्यपान करताना चिप्स किंवा कुरकुरीत पदार्थ खाऊ नका
दारू पिण्याच्या दरम्यान किंवा नंतर कुरकुरीत पदार्थ किंवा चिप्स खाऊ नका. तसेच तळलेले मोमोज किंवा चिकन टाळा. कारण त्यामुळे तुमच्या पचनात अडथळा निर्माण होऊ शकतो.
दारू पिल्यानंतर गोड खाऊ नका
मिठाईने नशा वाढते असे म्हणतात. अशा स्थितीत दारू पिल्यानंतर मिठाई न खाण्याचा प्रयत्न करावा. कारण दारूनंतर गोड अन्न हे विषासारखे आहे.
मांसाहारी आणि मसालेदार जेवण खाऊ नये
दारूमुळे पोटात अॅसिडीटी होते. त्यामुळे पोटातल्या जळजळीपासून वाचण्यासाठी दारू पिताना किंवा त्यानंतर मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ नये. बिर्यानी, कुर्मा भाजी असे पदार्थ खाणे टाळावे.
दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळा
दारू पीत असताना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करणे टाळले पाहिजे. दारू पिल्याने शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढते. अशा वेळी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे सेवन केले तर अपचनाचा त्रास होतो. म्हणून मद्यपान केल्यावर किंवा करण्याआधी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळा.
Diclaimer : ही फक्त माहिती आहे, एबीपी माझा दारू पिण्याचं कोणतंही समर्थन करत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या