Water Fasting for Weight Loss : सध्या अनेक जण वाढत्या वजनाच्या (Obesity) समस्येमुळे त्रस्त आहेत. लोक विविध मार्गांनी वजन कमी (Weight Loss) करण्याचा प्रयत्न करतात. काही जण व्यायाम करून तर काही जण डाएट करून वजन कमी करतात. सध्या डाएटिंगसाठी वॉटर फास्टिंग करणाऱ्यांचं प्रमाण अधिक दिसून येतं. तुम्हीही हा शब्द ऐकला असेल, वॉटर फास्टिंग म्हणने नक्की काय, ते कसं करतात, वॉटर फास्टिंगने फायदा होतो की तोटा या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घ्या.


वजन कमी करण्यासाठी 'वॉटर फास्टिंग' फॉर्म्युला


उपवास हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उपवास केल्याने शरीर डिटॉक्सिफाईड होते आणि पचनसंस्थाही चांगली राहते. यासोबतच मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीही राहते. भारतात उपवास आणि धर्म यांचा गहन संबंध आहे. भारतात उपवास करण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. आपल्या देशात मुख्यतः लोक देवासाठी उपवास करतात. पण आता काही लोक वजन कमी करण्यासाठी उपवास करतात.


'वॉटर फास्टिंग' चर्चेत


वजन कमी करण्यासाठी उपवास करण्याचा सध्या ट्रेंड आहे. वॉटर फास्टिंग बाबत तुम्ही ऐकलं असेल. वॉटर फास्टिंग करताना फक्त द्रव आहार घेऊन उपवास करणे. वॉटर फास्टिंग करताना अन्नाचे सेवन करण्याऐवजी पाणी, ब्लॅक कॉफी आणि साखर नसलेला चहा असा द्रव आहार घेतला जातो. वॉटर फास्टिंग आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं अनेक संशोधनांमध्ये समोर आलं आहे. वॉटर फास्टिंगमुळे जुनाट आजारांचा धोका देखील कमी होतो. तसेच शरीरातील चरबी कमी करण्यास देखील मदत करते. पण वॉटर फास्टिंगचे फायदे अनेक असले तर ते आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकतं. वॉटर फास्टिंग चुकीच्या पद्धतीने केल्याने शरीरालाही हानी पोहोचते.


'वॉटर फास्टिंग' म्हणजे काय?


'वॉटर फास्टिंग' म्हणजे उपवास ज्यामध्ये तुम्ही पाण्याशिवाय दुसरं काहीही खाऊ शकत नाही. आपल्या देशात धार्मिक कारणास्तव अनेक लोक हे व्रत पाळतात. पण आता लोक आपल्या आरोग्याला फायदा व्हावा, यासाठी हे व्रत पाळत आहेत. वॉटर फास्टिंग केल्याने तुमच्या शरीरातील जुन्या आणि खराब झालेल्या पेशी पुन्हा विकसित होण्यास मदत होते, असं संशोधनात समोर आलं आहे.


वॉटर फास्टिंगचा शरीरावर काय परिणाम होतो?


वॉटर फास्टिंगची वेळ 24 तासांपासून 3 दिवसांपर्यंत असू शकते. वॉटर फास्टिंग तुमच्या आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असतो. जर तुम्हाला हृदय, मूत्रपिंडाचे आजार, मायग्रेन, गाउट, टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह असेल तर अशा व्यक्तींनी वॉटर फास्टिंग करणं टाळावं. त्याशिवाय गर्भवती महिलांनी वॉटर फास्टिंग करू नये.


वॉटर फास्टिंगनंतर आहार कसा असावा?


सुरुवातीला वॉटर फास्टिंग करताना तुम्ही थोड्या काळासाठी करावा, याची वेळ नंतर हळूहळू वाढवू शकता. वॉटर फास्टिंग म्हणजे उपवास केल्यानंतर लगेचच जड अन्न खाऊ नये. उपवासानंतर हलके अन्नपदार्थ हळूहळू खावे आणि भरपूर पाणी प्यावे. जर तुम्ही उपवासानंतर जास्त खाल्ले तर तुम्हाला रिफीडिंग सिंड्रोमचा धोका निर्माण होऊ शकतो. या स्थितीत शरीरातील द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइटच्या पातळीत झपाट्याने बदल होतो.


वॉटर फास्टिंगचे तोटे


वॉटर फास्टिंग करताना, आपण फक्त लिक्विड आहार घेतो. यामध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात. जर तुम्ही वॉटर फास्टिंग करताना कमी पाणी प्यायलं तर शरीरातील डीहायड्रेशनचा धोका वाढतो. यासोबतच वॉटर फास्टिंग वेळी मळमळ, डोकेदुखी, बद्धकोष्ठता, चक्कर येणे आणि रक्तदाब कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात.





संबंधित इतर बातम्या :


Health Tips : तुम्हालाही झटपट वजन कमी करायचंय? मग ग्रीन कॉफीचे सेवन नक्की करा