मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गानं जगभरातील अनेक देशांच्या आरोग्य यंत्रणांची परीक्षा पाहिली. या विषाणूच्या संसर्गाची सुरुवात झाल्या क्षणापासून काही गोष्टींनी जीवनात महत्त्वाचं स्थान मिळवलं. मास्क, सॅनिटायझर, डिसइंफेक्टंट ही त्याचीच उदाहरणं. यातच आणखी एका गोष्टीला डॉक्टरांपासून ते अगदी सर्वसामान्यांनीही प्राधान्य दिलं, ते म्हणजे पल्स ऑक्सिमीटर.


गेल्या काही दिवसांपासून शरीरातील ऑक्सिजनची पातळी ओळखणाऱ्या या उपकरणाची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. असं असलं तरीही अद्यापही यातील काही तांत्रिक बाबी लक्षात नसल्यामुळं अनेकांकडूनच ऑक्सिमीटरा चुकीच्या पद्धतीनं वापर केला जात आहे. ज्यामुळं चुकीचं रिडींग पाहून अनेकांचीच अस्वस्थता आणखी वाढतही आहे. त्यामुळं ऑक्सिमीचर वापरण्याची योग्य पद्धत जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. 


Coronavirus Lockdown : 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले महत्त्वाचे संकेत


नेमका कसा वापरावा ऑक्सिमीटर?  


- रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यापूर्वी जवळपास 15 मिनिटांपूर्वी कोणतंही काम करु नका. 


- निवांत झोपा आणि दीर्घ श्वास घ्या. 


Covid-19 : लहान मुलांचं कोरोनापासून संरक्षण कसं कराल? अशी घ्या काळजी


- आता ऑक्सिमीटर हाताच्या मधल्या बोटावर किंवा इतर कोणत्याही बोटावर लावा आणि अजिबात हालचाल करु नका


- ऑक्सिमीटरची रिडींग अंतिम तेव्हापर्यंत मानू नका, जोपर्यंत आकडा स्थिर होत नाही. 


- ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याचं लक्षात येत असेल (94 पेक्षा कमी) तर प्राथमिक उपाय म्हणून न घाबरता सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.