Thyroid Gland : थायरॉईड ग्रंथी आपल्या घशाच्या भागात असते आणि ती खूप लहान असते. पण, आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि अनेक आजारांपासून संरक्षण करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. थायरॉईड ग्रंथी देखील आपली चयापचय प्रणाली योग्य राखण्यात मोठी भूमिका बजावते. जर ही ग्रंथी खूप काम करत असेल किंवा खूप मंद गतीने काम करत असेल तर दोन्ही स्थितीत शरीरात त्रास होतो. हेच कारण आहे की, जेव्हा थायरॉईडची समस्या उद्भवते, तेव्हा एक लक्षण नाही तर शरीरात अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात, ज्याद्वारे तुम्ही थायरॉइड ओळखू शकता. ही लक्षणं नेमकी कोणती ते जाणून घ्या. 


1. दुःख आणि नैराश्य :


थायरॉईडचा प्रभाव प्रथम तुमच्या मूडवर दिसून येतो. थायरॉईडच्या समस्येमुळे अनेकदा मूड खराब होतो. झोप कमी होते, थकवा जाणवू लागतो आणि चिडचिड वाढते. ही परिस्थीती दीर्घकाळ अशीच राहिली तर नैराश्यसुद्धा येते.  


2. बद्धकोष्ठता : 


जेव्हा थायरॉईड ग्रंथीमध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा त्याचा चयापचय क्रियांवरही परिणाम होतो. त्यामुळे पोट नीट साफ न ​​होणे, बद्धकोष्ठता, जास्त वायू तयार होणे, पोट फुगणे इत्यादी समस्या कायम राहतात.


3. थायरॉईडबद्दलचे 'हे' गैरसमज दूर करा


बहुतेक लोकांचे मत आहे की, या आजाराने पीडित व्यक्तीचे वजन वाढते. हे जरी बरोबर असलं तरी थायरॉईडचा त्रास होत असताना एखादी व्यक्ती लठ्ठ होते तर काही व्यक्तींचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. या दोन्ही परिस्थिती आरोग्यासाठी हानिकारक आहेत.


4. खूप वेळा भूक लागणे


थायरॉईडची समस्या असल्यास तीव्र भूक लागते आणि वारंवार भूक लागण्याची समस्या होऊ शकते. म्हणजेच, तुम्ही नुकतेच अन्न खाल्ले आहे आणि अर्ध्या तासानंतर तुम्हाला पुन्हा भूक लागली आहे आणि हा क्रम सतत चालू राहतो. 


5. चेहरा आणि डोळ्यांना सूज येणे


थायरॉईडचे एक अतिशय महत्त्वाचे लक्षण म्हणजे द्रवपदार्थांचा असामान्य संचय. त्यामुळे अनेकदा शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर म्हणजेच चेहरा आणि डोळे जळजळ होण्याची समस्या उद्भवते. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला पुरेशी झोप मिळत आहे, बरोबर खात आहे पण तरीही अनेकदा चेहरा आणि डोळे सुजतात. थायरॉईड व्यतिरिक्त, हे अॅनिमियाचे लक्षण देखील असू शकते.


6. असामान्य हृदयाचा ठोका :


थायरॉईड ग्रंथीच्या गडबडीमुळे हृदयाच्या ठोक्यावरही परिणाम होतो. जर तुम्हाला अचानक हृदय गती वाढणे, अस्वस्थता, घाम येणे किंवा हृदयाशी संबंधित इतर कोणतीही समस्या दिसली, तर ती हलक्यात घेऊ नका किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :