Digestion Tips : योग्य आहाराप्रमाणेच अन्नपचन (Digestion) होणं आवश्यक आहे. तुम्ही फरपूर प्रमाणात पोषक आहार (Healthy Diet) घेत असाल, मात्र त्याचे पचन योग्य प्रकारे होत नसेल, तर तुम्ही घेत असलेल्या पोषक आहाराचं (Nutrition) पूर्ण पोषण तुम्हांला मिळत नाही. याशिवाय तुम्हांला अपचन, गॅस, आंबट ढेकर, बद्धकोष्ठता (Constipation) यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. काही आयुर्वेदिक उपायांचा वापर करुन तुम्ही तुमची पचनशक्ती वाढू शकते.


कमकुवत पचनशक्तीची लक्षणे प्रथम जाणून घ्या



  • जेव्हा पचनशक्ती कमजोर असते तेव्हा अन्न पचायला खूप वेळ लागतो. यामुळे जेवण केल्यानंतर थकवा जाणवतो किंवा झोप येऊ लागते.

  • जेवणानंतर पोट फुगते.

  • गॅस तयार होतो आणि पोटात जडपणा जाणवतो.


चांगल्या पचनाशक्तीसाठी आयुर्वेदिक उपाय



  • लिंबाच्या रसामध्ये थोडे आले किसून टाका आणि त्यात चिमूटभर काळे मीठ मिसळा. जेवणापूर्वी याचं सेवन करा.

  • कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र खाऊ नका. म्हणजेच काकडी, कोशिंबीर जेवणासोबत खाऊ नये.

  • दह्यात मीठ मिसळून त्यापासून रायता बनवून खाऊ नका. त्यापेक्षा दही काहीही न घालता वेगळं सेवन करा. दह्यात साखर घालून खाऊ शकता.

  • रायता आणि कढी बनवण्यासाठी ताक वापरा.

  • जेवताना इतर कोणतंही काम करू नका. तुमचे संपूर्ण लक्ष फक्त तुमच्या खाण्यावर असलं पाहिजे. असं केल्यानं पचनासाठी आवश्यक रसांचा समतोल राखला जातो.

  • जेवणासोबत जिरे-हिंग मिसळून ताक घेतल्यानं फायदा होतो.

  • हरड्याच्या गोळ्या आणि पावडर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

  • जेवणानंतर बडीशेप आणि साखर मिठाई खाल्ल्यानं पचनास मदत होते.

  • वेळेवर झोपणे आणि उठणे यामुळे पचमशक्ती चांगली राहते.

  • त्रिफळा चूर्णाचे सेवन केल्यानं पोट साफ राहते, पचनक्रियाची सुधारते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :