Knee Pain Remedies: हिवाळ्यात अनेकांना अंगदुखी, गुडघेदुखीची समस्या जाणवते. बदलता आहार आणि लाईफस्टाईलमुळे गुडघेदुखीची समस्येचा सामना अनेकांना करावा लागतो. ही समस्या वृद्धांमध्येच दिसून येत नाही, तर आता तरुणांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. अनेक तरुणांना हिवाळ्यात गुडघेदुखीचा त्रास होतो. हिवाळ्यात जर गुडघेदुखी समस्येपासून दूर राहायचं असेल तर या टीप्स तुम्ही फॉलो करु शकता. 


हळद
हळदीला अँटिऑक्सिडंट्सचे पॉवर हाऊस म्हटले जाते. हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात.  हळदीची पेस्ट गुडघ्यांवर लावल्याने हिवाळ्यात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. याशिवाय रात्री झोपताना दुधात हळद टाकूनही पिऊ शकता. याचे रोज सेवन केल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळेल.


गुडघेदुखी


थंडीमध्ये पायांचा व्यायाम तसेच वॉकींग केल्यानं गुडघेदुखी कमी होते. व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते. त्यामुळे गुडघेदुखी कमी होते. 


मोहरीच्या तेलाने मसाज करा
हिवाळ्यात पायांचा मोहरीच्या तेलानं मसाज करावा. तुम्ही घरीच मोहरीचं तेल बनवू शकता. यासाठी लसणाची एक पाकळी कापून त्यात दोन चमचे मोहरीच्या तेल टाका आणि हे मिश्रण गरम करा. हे तेल हळूहळू गुडघ्यांवर लावा. 10 ते 15 मिनीट या तेलाचा वापर करुन गुडघ्याची मालिश करा. 


गुडघेदुखी कमी करण्यासाठी आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते. तसेच व्हिटॅमिन सी  असलेले पदार्थ खाल्यानं हडे मजबूत होतात. तसेच आल्याचे छोटे तुकडे करून गरम पाण्यात टाका. नंतर पाणी गाळून त्यात चवीनुसार मध किंवा लिंबाचा रस टाकून प्या यामुळे गुडघेदुखी कमी होते.


तरुणांना हिवाळ्यात गुडघेदुखीची समस्या जाणवते. यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही व्यायाम आणि स्ट्रेचिंग करु शकता. तसेच, तुम्ही गरम पाण्यात कापडाच्या पॅडने फोमेंटेशन करू शकता. तसेच तुमच्या आहारात ओमेगा 3 फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचा समावेश करा. ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे मासे आणि शेंगदाणे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Hair Dandruff: हिवाळ्यात केसांत वारंवार कोंडा होतो? 'या' घरगुती टीप्स करा फॉलो