News Research on Headphone Use : तुम्ही हेडफोन्स (Headphone) वापरताय...? हेडफोन्सवर मोठ्या वाजात गाणी ऐकताय, तर तुम्हाला सावध करणारी ही बातमी. सध्या हेडफोन्सचा वापर (Headphone Use) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानग्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत अगदी प्रत्येकाच्याच कानात हेडफोन दिसतात. ए हेडफोन लावून कर्णकर्कश आवाजात गाणी ऐकणाऱ्या तरुणांची संख्या वाढतेय. मात्र हेडफोन्सच्या अतिवापरामुळे 12 ते 34 वयोगटातील तरुणांची श्रवणशक्ती धोक्यात आलीय.. जगभरतील 10 लाख लोकांना हेडफोन्सच्या अतिवापरामुळे बहिरेपणा येण्याचा धोका निर्माण झाला आहे. बीएमजे ग्लोबल हेल्थ जनरर्ल्समध्ये तज्ज्ञ संशोधकांनी हा इशारा दिला आहे. जगातील 43 कोटीहून अधिक जणांची श्रवण शक्ती कमी झाली असल्याची माहिती यामध्ये देण्यात आलीये. त्यामुळे तरुणांना सुरक्षित श्रवण सवयी लावण्याची गरज व्यक्त होत आहे. 


संशोधनात काय म्हटलंय? 


बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, स्मार्टफोन, हेडफोन आणि ईअरबड्स यांसारख्या गॅजेट्सचा वापर करणाऱ्यांच्या एकूण संख्येपेक्षा 1 बिलियनहून अधिक लोक आपली ऐकण्याची क्षमता गमावू शकतात. 


बीएमजे ग्लोबल हेल्थ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हेडफोन आणि ईअरबड्सचा वापर आणि मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे एक अब्जाहून अधिक तरुण आणि तरुणांची श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका आहे. अमेरिकेतील साऊथ कॅरोलिना मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांसह आंतरराष्ट्रीय टीमनं सांगितलं की, जगभरातील सरकारांनी कानाच्या आरोग्यासाठी सुरक्षित ऐकण्याच्या धोरणांना तातडीनं प्राधान्य देण्याची गरज आहे. संशोधकांनी सांगितलं की सरकार, कंपन्या आणि नागरी समाजानं सुरक्षित ऐकण्याच्या पद्धतींना प्रोत्साहन देऊन जागतिक बहिरेपणा रोखण्यासाठी योगदान देणं आवश्यक आहे.


'ही' वॉल्यूम लेव्हल कानासाठी धोकादायक 


संशोधनानुसार, बहुतेक लोक इयरफोनमधून 105 dB पर्यंत आवाज ऐकतात. थिएटर किंवा नाट्यगृहांमध्ये सरासरी आवाज पातळी 104 ते 112 dB पर्यंत असते. आवाजाची ही पातळी कानांसाठी अत्यंत धोकादायक असते. तुम्ही अशा वातावरणात अगदी थोड्या काळासाठी असलात तरीही त्याचा तुमच्या कानांवर विपरित परिणाम होतो. 


हेडफोन कमी आवाजात ठेवा


जर तुम्ही नियमितपणे बराच वेळ मोठा आवाज ऐकत असाल तर तुम्ही तुमच्या कानाला इजा करत आहात. ऐकण्याचे नुकसान टाळण्यासाठी हेडफोनचा आवाज कमी ठेवा.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


नाकात बोटं घालताय? 'हा' गंभीर आजार बळावू शकतो, संशोधनातून धक्कादायक खुलासा