Hair dandruff: हिवाळ्यात (Winter) अनेकांच्या केसांत कोंडा (Dandruff) होतो. कोंडा जास्त झाला तर केस गळणे किंवा केसांमध्ये खाज निर्माण होणे या समस्या जाणवतात. कोंड्याची समस्या नेहमी गांभीर्याने घेतली पाहिजे. जर हिवाळ्यात तुमच्या केसांमध्ये कोंडा होत असेल तर तुम्ही या घरगुती टिप्स फॉलो करु शकता.
टी ट्री ऑइल
कोंडा होत असेल तर टी ट्री ऑइल तुम्ही डोक्याला लावू शकता. टी ट्री ऑइलमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात. जे कोंड्याची समस्या दूर करतात.
खोबरेल तेल आणि लिंबाचा रस
कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेल आणि लिंबाचा रस मिसळून केसांना लावा. हे मिश्रण केसांना लावलाता केसांची मालिश करा.
दही
दह्यामध्ये नारळ तेल मिक्स करुन केसांच्या मुळांना लावल्यानं कोंडा कमी होतो. तसेच दही आणि नारळाच्या तेलाचं हे मिश्रण केसांना लावले तर केस मजबूत आणि सिल्की होतात. कोंडा दूर करण्यासाठी दही आणि बेकिंग पावडरचं मिश्रण हलक्या हातांनी टाळूला लावा.
कडुलिंब आणि तुळशीची पानांचे पाणी
हिवाळ्यात केस कोरडे आणि डॅमेज होतात. केसांमध्ये कोंडा झाला तर केस गळतात. त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही कडुलिंब आणि तुळशीच्या पानांचे पाणी केसांना लावू शकता. हे पाणी तयार करण्यासाठी प्रथम एका भांड्यामध्ये पाणी घ्या. त्यानंतर त्या पाण्यामध्ये कडुलिंब आणि तुळशीची पाने टाका. त्यानंतर हे पाणी उकळून घ्या. उकळलेल्या पाण्यामध्ये थंड पाणी मिक्स करुन त्या केस धुवा.
अंड्याचा हेअर मास्क लावा
अंड्याचा हेअर मास्क लावण्यानं देखील कोंडा कमी होतो. अंड्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी दोन अंडी, एक चमचा लिंबाचा रस आणि काही थेंब लॅव्हेंडर तेल मिसळा. हे मिश्रण केसांना वीस मिनिटे लावा आणि नंतर शॅम्पूने केस धुवा. यामुळे केसांनाही चमक येईल.
थंडीमध्ये केससारखे धुवू नका. सारखे केस धुतल्याने केसांमधील नॅचरल ऑइल (Natural Oil) निघून जाते. त्यामुळे केस कोरडे होतात. केस अठवड्यातून दोन वेळाच धुवावेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: