Diabetes Symptoms : आधुनिक काळात लोक अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, मधुमेह यांसारखे आजार होणे आजकाल सामान्य झाले आहे. जर आपल्याला अशा प्रकारच्या जीवनशैलीशी संबंधित आजार असतील तर आपण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून समस्या नियंत्रणात ठेवता येतील. विशेषत: जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर स्वतःची विशेष काळजी घ्या. कारण त्यामुळे तुम्हाला इतर अनेक आजार होण्याचा धोका असतो. मधुमेही रुग्णांच्या शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. काही रुग्णांना त्याची लक्षणे पायातही दिसतात. चला जाणून घेऊया पायांमध्ये मधुमेहाची दिसणारी लक्षणे कोणती आहेत?
पाय सुन्न होणे :
मधुमेहाचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे पाय सुन्न होणे. वास्तविक, या समस्येमध्ये शरीरातील रक्तातील साखरेवर परिणाम होतो. जर तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी खूप वाढत असेल तर तुम्हाला अशी लक्षणे दिसू शकतात. याशिवाय काही लोकांना यामुळे पाय दुखू शकतात.
सुजलेले पाय :
मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या पायावर सूज देखील येऊ शकते. त्यामुळे रूग्णांना चालण्यास, उभे राहण्यास किंवा बसण्यास त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला अशी लक्षणं दिसत असतील तर त्वरित संबंधित रूग्णांशी संपर्क साधा.
पाय दुखणे :
मधुमेहामुळे तुमच्या पायात फोड येऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त असते तेव्हा शरीरात बॅक्टेरिया पसरू लागतात, ज्यामुळे रुग्णांना इन्फेक्शन आणि पायाभोवती जखमा होऊ लागतात. मधुमेहामध्ये पायात अशी लक्षणे दिसण्यासोबतच ताणतणावात राहणे, केस गळणे, वजन कमी होणे अशी अनेक लक्षणे दिसू शकतात. शरीरात अशी लक्षणे दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :