Health Tips : धावपळीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह (Diabetes) हा आजार अत्यंत सामान्य झाला आहे. आजकाल लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना मधुमेहाच्या समस्येचा सामना करावा लागतोय. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैली पूर्णपणे बदलली पाहिजे. त्याचबरोबर खाण्याच्या सवयीसुद्धा बदलल्या पाहिजेत. तसेच मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. यावर रामबाण उपाय म्हणजे किवी (Kiwi) हे फळ. जर तुम्ही किवीचे सेवन केले तर ते तुम्हाला अनेक अर्थाने फायदेशीर ठरू शकते. चला तर जाणून घेऊयात किवीचे फायदे.   
किवीमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळून आल्याचे अनेक अभ्यासांत आढळून आले आहे. संत्री आणि लिंबाच्या दुप्पट प्रमाणात या फळात व्हिटॅमिन सी आढळते. फक्त एक सर्व्हिंग दररोज 117 टक्के व्हिटॅमिन सी आणि 21 टक्के आहारातील फायबर प्रदान करते. याशिवाय हे फळ खाल्ल्याने इतर अनेक प्रकारची पोषकतत्त्वे मिळतात. 
 
प्रतिकारशक्ती वाढते : किवी हे असे एक फळ आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय किवीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सही आढळतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच शरीराला अनेक आजारांशी लढण्याची ताकद देते. हे रोज खाल्ल्याने अस्थमा सारख्या आजारांपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो.


किवी हृदयासाठी फायदेशीर : व्हिटॅमिन ई आणि पोटॅशियम देखील किवीमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. हे रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवते आणि तुमचे हृदय मजबूत करते. याशिवाय व्हिटॅमिन ई देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे रोज खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात.
 
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याा मदत : किवी हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगले फळ मानले जाते. आरोग्य तज्ञांच्या मते, या फळामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. किवी खाल्ल्याने सेरोटोनिन वाढवणारी रसायने सक्रिय होतात, ज्यामुळे रात्री चांगली झोप लागते. मधुमेहाच्या रुग्णाने दररोज किवीचे सेवन करावे.
 
आरोग्याचा खजिना : किवी हे फळ आरोग्याचा उत्तम खजिना मानला जातो. या फळामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात. ल्युटीन प्रमाणेच झेक्सॅन्थिन, फायटोकेमिकल्स असतात. ते शरीरात लोहाचे शोषण वाढविण्यास मदत करतात. अॅनिमियाची समस्या असलेल्या लोकांना याचा फायदा होतो. दररोज एक किवी खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. डोळ्यांसाठीही हे एक अत्यंत महत्त्वाचे फळ मानले जाते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :