Saree Cancer : साडी म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय..! असं म्हणतात, साडी सोबत स्त्रियांच्या दु:खसुखाचे धागे बांधले गेलेले असतात. भारतातील महिलांना साडी नेसायला प्रचंड आवडते. पण तुम्हाला माहित आहे का? की साडी नेसल्याने देखील कॅन्सर (Saree Cancer) होऊ शकतो. आणि भारतात या आजाराचं प्रमाण वाढत चाललंय. हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे खरंय.. हा साडी कॅन्सर नेमका आहे काय? साडी नेसल्यानेही कॅन्सर होऊ शकतो? जाणून घ्या..


 


भारतासोबतच परदेशातही साडीचे वेड..!


भारतातील पारंपारिक कपड्यांचा विचार केला तर साडीचे नाव प्रथम घेतले जाते. लग्नापासून पुजेपर्यंत महिलांना साडी नेसायला आवडते. आता फक्त भारतातच नाही तर परदेशातही वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसली जात आहे. पण साडी नेसल्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो असे तुम्हाला सांगण्यात आले तर? जाणून घ्या सविस्तर


 


साडीचा कर्करोग म्हणजे काय?


सर्वात आधी आपण साडीचा कर्करोग म्हणजे काय ते जाणून घेऊया. तज्ज्ञांच्या मते, भारतीय खेड्यातील महिला दररोज संपूर्ण दिवस साडी नेसतात. पेटीकोट ज्यावर साडी बांधलेली असते त्याची कॉटन कॉर्ड म्हणजे परकरची नाडी खूप घट्ट असते, त्यामुळे कंबरेवर खुणा दिसतात आणि कालांतराने या खुणा काळ्या होतात. या गुणांमुळे स्त्रियांमध्ये स्क्वामस सेल कार्सिनोमा (SCC) होतो, जो त्वचेच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे.


 


बिहार, झारखंडमधील आजार झपाट्याने पसरतोय


अति उष्णतेमध्ये राहणाऱ्या महिलांना हा आजार होण्याचा सर्वाधिक धोका असतो. बिहार आणि झारखंडमधील महिलांमध्ये हा आजार झपाट्याने पसरत आहे. ओन्ली माय हेल्थमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, एससीपीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ. सुदीप सांगतात की, भारतातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या महिला वर्षभर साडी नेसतात. कंबरेवर साडी बांधल्याच्या खुणा असतात. कंबरेवर पेटीकोट घातलेल्या कॉटन नाड्यामुळे ही खूण होते. यामुळे कंबरेला घासले जाते. त्यामुळे कंबरेवर काळे डाग दिसतात. हे चिन्ह शेवटी त्वचेच्या कर्करोगात बदलते. 


 


कांगरी कर्करोग म्हणजे काय? 


आता आपण कांगरी कर्करोगाबद्दल जाणून घेऊ, भारतात कांगरी कर्करोगाचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. हा देखील त्वचेचा कर्करोग आहे. काश्मिरी लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांच्या कपड्यांमध्ये कांगरी जाळतात, ज्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो.


 


घट्ट जीन्स घालत असाल तर... सावधान!


साडी आणि कांगरी व्यतिरिक्त घट्ट जीन्स परिधान करणे देखील महिलांसाठी कर्करोगाचा धोका बनू शकते. खूप घट्ट कपडे परिधान केल्याने प्रायव्हेट पार्टला नुकसान होते. यामुळे टेस्टिक्युलर कॅन्सरचाही धोका असतो.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


C-Section : गेल्या 5 वर्षात सी-सेक्शन प्रसूतीचे प्रमाण वाढले, गरजेशिवाय होतायत प्रसूती? खासगी रुग्णालयांची बक्कळ कमाई? संशोधनातून माहिती समोर