निसर्गोपचार 
कॅन्सरमध्ये allopathy उपचारांबरोबरच निसर्गोपचाराच्या काही पद्धतींचा अवलंब केल्यास कॅन्सर बरा होण्यास मदत होऊ शकते. खाली आपण अशाच काही पद्धती बद्दल जाणून घेणार आहोत.


1) निर्जला उपवास (Dry Fasting)- 


 जपानचे ओसुमी, योशिनोरी योशिओ यांना “dry fasting (निर्जला उपवास) आणि autophagy( स्वभक्षण)” या विषयांवरील संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे.


कॅन्सरमध्ये शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होते. निर्जला उपवास केल्यामुळे शरीरातील मुख्य पेशी त्यांचे काम नियमित पणे चालू ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पोषण द्रव्यांसाठी या अनियंत्रित वाढलेल्या पेशींचे भक्षण करतात.


https://marathivishwakosh.org/47353/


2) अल्कधर्मी आहार (Alkaline Diet) -


मानवी शरीरातील रक्त हे किंचित अल्कधर्मी (Alkaline) असते. रक्ताचा सामान्य pH हा 7.35 to 7.45 आहे. आपले शरीर हा pH 7.4 च्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करते. परंतु चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या पद्धतीमुळे हेच रक्त आम्लधर्मी (Acidic) होते. म्हणजेच रक्ताचा pH हा 7 च्या खाली येतो.


कॅन्सरच्या पेशींची वाढ ह्या आम्लधर्मी वातावरणात खूप चांगल्या रीतीने होते. कॅन्सर पेशींची वाढ रोखण्यासाठी शरीरातील रक्त अल्कधर्मी असणे गरजेचे असते. त्यासाठी आपला आहार देखील अल्कधर्मी म्हणजेच alkaline असणे आवश्यक आहे. अल्कधर्मी आहार म्हणजे कच्चा आणि ताजा आहार. यामध्ये सर्व प्रकारची फळे, भाज्या, रस यांचा समावेश होतो.


3) Empty calories ( रिक्त कॅलरी) टाळणे


"रिक्त कॅलरी" म्हणजे असे खाद्यपदार्थ आणि शीतपेये जे लक्षणीय प्रमाणात कॅलरीज (ऊर्जा) प्रदान करतात परंतु जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि प्रथिने यांसारखे आवश्यक पोषक तत्व कमी असतात किंवा नसतात. या पदार्थांमध्ये विशेषत: जास्त प्रमाणात साखर, घन फॅट किंवा दोन्ही असतात.


अनेकदा रिक्त कॅलरीज असणाऱ्या पदार्थ आणि पेयांच्या उदाहरणांमध्ये साखरयुक्त शीतपेये, कँडी, पेस्ट्री आणि इतर मिठाई, तसेच काही प्रक्रिया केलेले स्नॅक्स आणि तळलेले पदार्थ यांचा समावेश होतो. या वस्तूंमध्ये कॅलरी जास्त असू शकतात, परंतु त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा अभाव आहे जे संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.


या रिक्त calories कॅन्सर पेशींना वाढीसाठी मदत करतात. रिकामे कॅलरी असलेले अन्न आणि पेये यांचे अति प्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरात insulin resistance वाढून कर्करोग होण्याची जोखीम वाढू शकते. 



 योग 
1) ध्यान ( meditation)


मानवी मेंदू मध्ये पाच प्रकारचे तरंग उत्पन्न होतात.
अल्फा तरंग- शरीर आणि मेंदू विश्रांती अवस्थे मध्ये असतात तेव्हा उत्पन्न होतात.
बीटा तरंग - जेव्हा आपले शरीर आणि मेंदू काम किंवा विचारांमध्ये व्यस्त असतात तेव्हा उत्पन्न होतात.
गामा तरंग - हे तरंग हे नेहमी problem solving आणि concentration च्या वेळी उत्पन्न होतात. 
डेल्टा तरंग - शरीर आणि मेंदू झोपेत असताना हे तरंग उत्पन्न होतात.
थीटा तरंग - हे तरंग गाढ झोपेच्या वेळी उत्पन्न होतात.


मानसिक आणि शारीरिक ताणामुळे शरीरात cortisol या stress hormone ची वाढ होते ज्यामुळे पेशींमधील metastatic activities (cancer शरीरात इतर ठिकाणी पसरणे) मध्ये वाढ होऊन कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
Meditation मुळे या थीटा तरंग मध्ये वाढ होते. याच बरोबर grey आणि white matter समतोल साधला जातो. शरीरातील cortisol ची पातळी कमी होऊन dopamine आणि serotonine सारखे चांगले हार्मोन्स मध्ये वाढ होते. यामुळे ताण( stress) कमी होतो आणि कॅन्सर पेशींची वाढ रोखली जाते.


ध्यान करताना ओंकार ध्यान आणि भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे कॅन्सर उपचारांमध्ये मदत होते.


2) दीर्घ श्वास( deep breathing)
शरीरातील वाढलेल्या co2 पातळी मुळे metastatic activities मध्ये वाढ होते आणि कॅन्सर पेशींची सुद्धा वाढ होते. दीर्घ श्वास घेतल्यामुळे शरीरात oxygen ची पातळी वाढते आणि metastatic activities कमी होतात.


टीप: वरीलपैकी कोणतेही उपचार करताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शना खालीच करावेत. तसेच blood circulation वाढेल अशा कोणत्याही activities करू नयेत.


टीप - वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहचवत आहे. याचा एबीपी माझाशी कोणताही संबंध नाही.