AIIMS Delhi Cancer Treatment : कर्करोगावरील उपचारांसाठी (Cancer Treatment) जगभरातील देशातील वैज्ञानिकांकडून संशोधन सुरु आहे. एका नव्या संशोधनात वैज्ञानिकांना यश आलं आहे. यामुळे कॅन्सर रुग्णांसाठी आक्षेचा किरण मिळाला आहे. कर्करोगावरील 'थेरॅनोस्टिक्स' नावाची उपचार पद्धती सध्या चर्चेत आहे. या 'थेरॅनोस्टिक्स' उपचार पद्धतीद्वारे कर्करोगाच्या गाठी ओळखण्यासाठी किरणोत्सर्गी औषधाचा वापर केला जातो. याचा वापर ट्यूमरच्या उपचारादरम्यान आणि इतर औषधे पद्धतीमध्ये वापरली जातो.


दिल्लीचे एम्स रुग्णालय 15 वर्षांपासून कर्करोग उपचारावर संशोधन करत आहे. कॅन्सर रुग्णांच्या उपचार पद्धतीत सुधारणा करता येण्याचा हा प्रयत्न आहे. या नवीन उपचार पद्धतीमुळे कर्करोग रुग्णांचं वय वाढण्यात मदत झाली आहे. दोन वर्षांत कर्करोग रुग्णांच्या जीवनमानात वाढ झाल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे.


उपचार पद्धती कोणती?


दिल्लीचे एम्स रुग्णालयातील न्यूक्लियर मेडिसिन विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. सी.एस. बल यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'थेरॅनोस्टिक्स' उपचारात कॅन्सर रुग्णाच्या शरीरातील कॅन्सरच्या गाठींना टार्गेट करून काढून टाकलं जाईल. यावेळी, या उपचार पद्धतीचा रुग्णाच्या शरीरातील निरोगी पेशीवर परिणाम होणार नाही. या उपचारामधील रेडिएशनची पद्धत वेगळी आहे. ज्या रुग्णांना पारंपारिक कर्करोग उपचार यशस्वी होण्याची शक्यता असते, अशा रूग्णांवर ही थेरपी वापरली जाते.


थेरॅनोस्टिक्स उपचार पद्धती नेमकी काय आहे?


थेरनोस्टिक्स हा शब्द निरीक्षण आणि उपचारांवरून आला आहे. हे रेडिओन्यूक्लाइड्स किंवा रेडिओआयसोटोपसह लेबल केलेल्या रेणूंच्या संकल्पनेशी संबंधित आहे. यामध्ये रेडिएशन आणि केमोथेरपीच्या निवडक गुणधर्म एकत्रित करण्यात आले आहेत. शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी यांसारख्या दीर्घकालीन कर्करोगावरील उपचारांची ही पहिली पद्धत आहे. कर्करोग इतर अवयवांमध्ये पसरलेल्या प्रकरणांमध्ये, हे औषध देखील त्यावर नियंत्रण ठेवते. 


अनेक प्रकारच्या कर्करोगावरील सर्वोत्तम उपचार


जेव्हा टेस्टोस्टेरॉनची पातळी कॅस्ट्रेशन पातळीच्या वर चढते, तेव्हा ही थेरपी कॅस्ट्रेशन-इम्यून प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रूग्णांवर उपचार करते. त्या उपचार पद्धतीचे सकारात्मक परिणाम रेडिओआयोडीन-रिफ्रॅक्टरी थायरॉईड कर्करोग, न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर, तिहेरी-नकारात्मक स्तनाचा कर्करोग आणि मेड्युलरी थायरॉईड कर्करोगात देखील दिसून येत आहेत.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Curd Benefits : दही खाण्यापूर्वी त्यातील पाणी काढून टाकल्याने होईल दुप्पट फायदा होईल; जाणून घ्या