Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान (Pregnancy) महिलांची (Women) विशेष काळजी (Care) घेतली जाते. गर्भधारणेच्या काळात काही औषधांपासून (Medicine) दूर राहणे आवश्यक असते. अन्यथा त्यांचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊन गर्भपाताची समस्या संभवते. गर्भवती महिलांनी बेन्झो (Benzo) औषधांपासून (Drugs) दूर रहावं. एका अभ्यासानुसार, गर्भावस्थेत बेन्झो औषधांच्या सेवनाने गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. गर्भावस्थेत बेन्झो गोळ्यांमुळे गर्भपात होण्याचा धोका वाढतो.
गर्भवती स्त्रियांनी 'या' औषधांपासून दूर रहा
चिंता, नैराश्य आणि निद्रानाशावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधांचा समूह बेंझोडायझेपाइन्स (Benzodiazepines), गर्भधारणेदरम्यान घेतल्यास गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो, असे एका नवीन अभ्यासात आढळून आले आहे. गर्भवती महिलांनी तणाव, डिप्रेशन आणि झोपेच्या गोळ्या घेणे टाळावे. बेन्झो औषधांचा वापर तणाव, डिप्रेशन आणि झोपेसंबंधित समस्या या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.
'या' औषधांमुळे गर्भपाताचा धोका
बेंझो औषधांच्या वापरामुळे गर्भपाताचा धोका वाढू शकतो. बेंझो औषधांचा उपयोग चिंता, नैराश्य आणि निद्रानाशावर उपचार करण्यासाठी केला जातो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की, गर्भधारणेदरम्यान या औषधांचा वापर केल्यास गर्भपात होण्याची शक्यता वाढते. बेंझोडायझेपाइन याला 'बेंझोस' म्हणून ओळखलं जातं. Xanax, Valium, Ativan आणि Klonopin ही काही प्रसिद्ध बेंझो औषधे आहेत, ज्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.
संशोधनात काय समोर आलं?
तैवानमधील संशोधकांनी गर्भधारणेपूर्वी, केवळ गर्भधारणेदरम्यान आणि दोन्हीही स्त्रियांमध्ये गर्भपाताच्या प्रकरणांचा अभ्यास केला. त्यांनी दोन दशलक्ष महिलांमधील 30 लाखांहून अधिक गर्भधारणेचा अभ्यास केला आणि आढळलं की, 4.4 टक्के, किंवा 136,130 गर्भपात झाला. संशोधकांनी सर्व महिलांच्या वैद्यकीय इतिहासाचे विश्लेषण केले आणि असे आढळून आले की ज्या महिलांनी बेंजोस घेतले त्यांच्यामध्ये बेंझोस न घेतलेल्या स्त्रियांपेक्षा सरासरी 70 टक्के जास्त गर्भपात होण्याची शक्यता असते.
संशोधकांनी दिसून आलं की, महिलेचं वय आणि आरोग्य यासारख्या इतर घटकांचा विचार केला असताही हा धोका कायम आहे. व्हॅलियम सारख्या दीर्घ परिणाम करणाऱ्या बेंजो औषधांनी गर्भपाताचा धोका 67 टक्क्यांनी वाढवला, तर व्हर्सेडसारख्या कमी परिणामच्या बेंझो औषधांनी हा धोका 66 टक्क्यांनी वाढवला.
बेंजोसमुळे गर्भपात कसा होऊ शकतो?
संशोधकांच्या मते, गर्भधारणेदरम्यान घेतलेली बेंजो औषधे आई आणि प्लेसेंटामधील अडथळा पार करू शकतात आणि गर्भावर औषधांचा परिणाम होऊ शकतो. संशोधकांच्या मते, बेंझोडायझेपाइन्स पेशींच्या विकासात आणि वाढीमध्ये भूमिका बजावतात, बेंझोडायझेपाइन्सच्या संपर्कात आल्याने गर्भाच्या विकासात अडथळा निर्माण होऊन त्यामुळे गर्भपात होऊ शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :