Curd Benefits : दही (Curd) आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. दही ही भारतीय घरांमध्ये सर्वाधिक वापरली जाणारा पदार्थ आहे. प्रत्येक ऋतूमध्ये पोषणयुक्त आहार आवश्यक असतो. उन्हाळ्यात दही दररोज खाल्लं जातं. पण थंडीत दही खाण्याचे आयुर्वेदामध्ये अनेक फायदे सांगण्यात आलेले आहेत. कोरडं दही ज्या दह्यामधील पाणी पूर्णपणे काढून टाकलं जातं त्याला त्रिशंकू दही असंही म्हटलं जातं. दही हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. त्रिशंकू दही हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. पण आपल्या आहारात त्याचा समावेश करावा का? हे जाणून घ्या.


दही खाण्यापूर्वी त्यातील पाणी काढून टाका


गेल्या काही वर्षांत त्रिशंकू दही म्हणून ओळखले जाणारं पाणी काढून टाकलेलं दही खूप लोकप्रिय झालं आहे. जर तुम्हाला आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवायचं असेल तर, दही हा उत्तम उपाय आहे. दही तुमच्या आहारात एक चवदार आणि पौष्टिक पदार्थ आहे. त्रिशंकू दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात.


होईल दुप्पट फायदा होईल


त्रिशंकू दही बनवण्यासाठी दह्यातून सर्व पाणी काढून टाकलं जातं. त्रिशंकू दहीला गाळलेलं दही (Curd) किंवा 'हंग कर्ड' (Hung Curd) असंही म्हणतात. दही प्रथिनाव्यतिरिक्त कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्सनेही समृद्ध आहे. हे वजन कमी करण्यासाठी चांगला पर्याय आहे. त्रिशंकू दही हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजाराचं जोखीम कमी करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी देखील फायदेशीर मानलं जातं. दह्यामध्ये बायोएक्टिव्ह पेप्टाइड्स असतात, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करतात.


 


यासोबतच, दहीमधील प्रोबायोटिक्स कोलेस्टेरॉल पातळी सुधारण्याशी संबंधित आहेत. रोज हँग दही खाल्ल्याने त्वचेचं आरोग्यही सुधारते. स्ट्रेनिंग प्रक्रियेदरम्यान लैक्टोजचे प्रमाण देखील कमी केलं जातं, ज्यामुळे लैक्टोजची कमतरता असलेल्या लोकांसाठी त्रिशंकू दही अतिशय फायदेशीर ठरते. हँग कर्ड रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच टिश्यू, हार्मोन्स आणि एन्झाइम्सच्या दुरुस्तीसाठी खूप फायदेशीर आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Human Mind : एका दिवसात आपल्या डोक्यात एकूण किती विचार येतात? 'इतके' टक्के असतात निगेटिव्ह; जाणून बसेल धक्का