Human Mind : जगातील अतिशय वेगवान गोष्ट म्हटलं की, प्रकाश (Light) असं उत्तर मिळतं पण, त्यापेक्षाही वेगवान गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे मन (Mind). माणसाच्या मनातील (Human Mind) विचारांचा वेग कशाचाही पेक्षा जास्त आहे. माणस विचारांचे किल्ले बांधून ते मोडूही शकतो. माणसाच्या डोक्यात दिवसभरात अनेक विचार येत असतात, त्यातील काही सकारात्मक असतात तर, काही नकारात्मक असतात.


एका दिवसात आपल्या डोक्यात एकूण किती विचार येतात? 


मानवी मेंदू अतिशय रहस्यमय आहे. तुम्हाला माहित असेल की, स्टिफन हॉकिंग यांचं शरीर पूर्णपणे पॅरालाइज झाल्यानंतरही त्यांचा मेंदू कार्यरत होता. वैज्ञानिकांनाही मेंदूबाबत संपूर्णपणे माहिती नाही. मेंदू आणि मेंदूचं कार्य याबाबत अजून खूप संशोधन होणं बाकी आहे. मानवी मेंदूबाबत जगभरातील विविध वैज्ञानिकांकडून विविध प्रकारचं संशोधन केलं जात आहेत. कॅनडाच्या क्वीन्स युनिव्हर्सिटीमध्येही या विषयावर संशोधन करण्यात आलं आहे. 


मानवी मेंदूबाबत वैज्ञानिकांचं संशोधन


काही संशोधनात समोर आलं आहे की, मानव आपल्या मेंदूचा फक्त 10 टक्के वापर करतो. आपण दिवसभरात खूप विचार करतो, तेही विविध प्रकारचे असतात. कधी निगेटिव्ह, तर कधी पॉझिटिव्ह. मानवाच्या मनात दिवस भरात किती विचार येत असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का, नसेल तर ही बातमी वाचा आणि जाणून घ्या.


मेंदूबाबत रहस्य उलगडण्याचा कॅनडामधील वैज्ञानिकांचा प्रयत्न


मानवाच्या विचारांच्या वेगाला कसंलीही तोड नाही. आपल्या मनात दिवसभरात खूप विचार येतात. एका दिवसात आपल्या मनात साधारण किती विचार येत असतील तुम्हाला माहित आहे का? कॅनडामधील क्वीन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी याबाबत नवीन संशोधन केलं असून त्याचा अहवाल समोर आला आहे.


'इतके' विचार असतात निगेटिव्ह


कॅनडाच्या क्वीन्स युनिव्हर्सिटीमध्येही मेंदूतील विचार या विषयावर संशोधन करण्यात आलं. विद्यापीठाच्या संशोधनात असं आढळून आलं की, मानवी मनात दररोज सुमारे 6000 हून अधिक विचार येतात. यासोबतच त्याच्या मनात येणारे जवळपास 80 टक्के विचार हे नकारात्मक असल्याचंही समोर आलं आहे. संशोधकांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, माणसाच्या मनात येणारे विचार त्याच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टींवर जास्त प्रभाव टाकतात, त्यामुळे मानव स्वतःच्या विचारांचा समतोल राखू शकत नाही, ते त्याच्यासोबत घडणाऱ्या घडामोडींवर अवलंबून असतं.


विचार मोजण्यासाठी नवीन तंत्रज्ञान


मानवी मनात येणारे विचार कसे समजून घ्यावेत यावर नुकतेच एक नवीन संशोधन झाले आहे. या नव्या पद्धतीमुळे माणसाच्या मनात किती विचार येतात हे कळू शकते. या तंत्राद्वारे मनात विचार आल्यावर प्रत्येक विचार वेगळा करता येतो. म्हणजेच एखाद्याच्या मनात 1 तासात 20 विचार येत असतील आणि 1 तासात 30 येत असतील किंवा 5 विचार 1 मिनिटात येत असतील, तर या तंत्रज्ञानाद्वारे ते सर्व विचार वेळेनुसार वेगळे करून संपूर्ण डेटा मिळवता येतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pregnancy Tips : गर्भवती स्त्रियांनी 'ही' औषधे घेणे टाळा, गर्भपाताचा धोका